यावल नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील घनकचऱ्याचे विलगीकरण इत्यादी प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे परंतु ठेकेदार घनकचरा व्यवस्थापन अटी शर्तीनुसार काम करीत नसल्याने आणि त्याच्या कामाकडे कोणीही लक्ष देऊ नये तसेच कारवाई करू नये म्हणून तसेच ठेक्याचे पेमेंट वेळेवर मिळावे यासाठी ठेकेदाराने घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पात काळया जादूच्या माध्यमातून गळ्याला फास घेतलेली प्रतिमा, कल्पित पुतळा दर्शनी भागावर लावला आहे, त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी व भोंगळ कारभाराबाबत यावल नगरपरिषद मुख्याधिकारी,प्रशासक,विरोधक,आणि काही संघटना,काही समाजसेवकांसह आजी,माजी सदस्यांची वाचा बंद झाली असल्याची तसेच ठेकेदाराविरुद्ध कोणीही कार्यवाही करू शकणार नसल्याची जोरदार चर्चा संपूर्ण यावल शहरात सुरू आहे.
यावल शहरातून घराघरातून ओला व सुका घनकचरा संकलन व वाहतूक करून घनकचरा प्रकल्पात नेण्याबाबत आणि संकलित झालेल्या ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका यावल नगर परिषदेतर्फे एका ठेकेदाराला देण्यात आला आहे.
संपूर्ण यावल शहरातून ओला व सुका घनकचरा दररोज किती क्विंटल किती टन संकलित केला जातो?ओला व सुका कचरा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया अटी शर्तीनुसारच केली जाते का ? ठेकेदार घनकचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित वेळेवर आणि अटी शर्तीनुसार करीत आहे का? घनकचरा वाहतुकीसाठी ठेकेदार किती वाहनांचा वापर करीत आहे? घनकचरा संकलन करताना ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो किंवा नाही याची पाहणी आणि खात्री कोण करीत आहे? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात कामासाठी ठेकेदाराने किती मजूर कामावर ठेवलेले आहेत ते मजूर घनकचऱ्याचे विलगीकरण कोणत्या पद्धतीने करीत आहेत? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात देखरेख करण्यासाठी ठेकेदाराकडून किंवा नगरपालिकेकडून त्या ठिकाणी शिपाई किंवा गार्ड नसल्याने प्रकल्पात लहान लहान मुले आणि बाहेरील व्यक्ती कोणीही केव्हाही येऊन घनकचऱ्यातील काही वस्तू घेऊन जातात ही वस्तुस्थिती असताना याकडे यावल नगरपालिकेचे आणि संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे,ठेकेदाराला आतापर्यंत किती लाखाची देयेके देण्यात आली? घनकचऱ्याचे बिल काढताना कोणा कोणाला मासिक हप्ते दिले जातात? याबाबत तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात साठवून ठेवलेल्या घनकचऱ्याला आग कोणी लावली ? किंवा घनकचऱ्याला जाणून बुजून आग लावण्यात आली का? याची चौकशी कोण करणार? घनकचरा वाहतुकीसाठी यावल नगरपालिकेने खरेदी केलेले वाहने सुद्धा नादुरुस्त अवस्थेत घनकचरा प्रकल्पातच लागून असल्याने या वाहन खरेदीत सुद्धा मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून मागील वर्षी यावल नगरपालिके तर्फे संकलित केलेला घनकचरा ठेकेदाराने यावल तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या हडकाई- खडकाई नदीपात्रात टाकून दिला होता यातील 50% घनकचरा पावसाळ्यात नदीच्या पुरात वाहून गेला आणि आजही 50% घनकचरा नदीपात्रात पडून आहे ते प्रकरण सुद्धा आता यावल नगरपालिकेच्या अंगलट येणार असल्याचे तसेच घनकचरा संबंधित ठेकेदाराने अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा प्रकल्पात भव्य शेडमध्ये गळ्याला 'फास' घेत असलेला कपड्याचा पुतळा, प्रतिमा दर्शनी भागावर लटकवून ठेवलेली असल्याने यावल नगरपरिषद सर्व संबंधितांवर काळी जादू करून ठेवली असल्याने ठेकेदाराविरुद्ध कोणीही कायदेशीर कारवाई करू शकणार नाही असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा