महापरिनिर्वाण..
महापरिनिर्वाण दिनी
लीन होवू भीमचरणी
समग्र साहित्यवाचूनि
जाणूं विचार सरणी
पणती मनात लाऊनि
आणूं विचारआचरणी
खरेचं अनुयायी त्यांचे
जीवन होई सत्कारणी
संविधान देशी भारतां
सुपुत्र अद्वितीय गुणी
धन्य धन्य महामानवा
पिढ्यान् पिढ्या ऋणी
लढाअन्याय विरूध्द
चवदारतळ्याचे पाणी
वाचन संस्कृती वृध्दी
समृद्ध करी शिकवणी
असे असावेत कायदे
समर्थसमाज आखणी
धम्मचक्र प्रवर्तन करी
प्रतिमा सादर देखणी
जय भीम घोष करता
तव चरित्र आठवे मनी
इतिहासालाही वाटते
बाबासाहेब या परतूनि
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
टिप्पणी पोस्ट करा