तथाकथित पत्रकारांवर लवकरच कारवाई ? माहिती जनसंपर्क संचलनालय व पोलिसांकडून माहिती संकलनाचे काम सुरू.




यावल दि.13
यावल तालुक्यात ग्रामीण भागात बोगस तसेच तथाकथित आणि पत्रकारितेचे पुर्ण ज्ञान नसलेल्या काही पत्रकारांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे हे यावल शहरातील तालुका प्रतिनिधी, पत्रकारांना एक फार मोठे आव्हान आहे,या बोगस पत्रकारांना यावल शहरातीलच एक रिकाम-टेकडा पत्रकार फक्त एका तालुका प्रतिनिधीच्या संपर्कात आणि सानिध्यात राहुन तसेच दिवसभर गळ्यात गळा घालून आपण किती प्रभाव संपन्न आहे हे दाखवून चुकीचे मार्गदर्शन करून पन्नास,शंभर रुपयासाठी दिवसभर लाचारीचे धडे त्या बोगस पत्रकारांना शिकवीत आहे.
          ते काही बोगस पत्रकार  यावल तालुक्यात अवैध धंदे सुरू असल्याचे वृत्तपत्रातून दर्शवून पोलिसांकडून आर्थिक प्राप्ती कशी होईल या हेतूने दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करायला लागले आहेत,स्थानिक अधिकृत पत्रकार सुद्धा या तथाकथित पत्रकारांच्या कृत्यामुळे वैतागले आहेत,पोलीस खात्याला तर कोणत्याही विभागाकडून, शासनाकडून ठोस असे आर्थिक अनुदान कधीही प्राप्त होत नसल्याने आर्थिक भ्रष्टाचार गैर प्रकार होण्याचा प्रश्नच उद्भवत  नाही तरी सुद्धा आज समाजात पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आहे या वस्तुस्थितीचा काही बोगस पत्रकार पोलिसांना टार्गेट करून पोलिसांविरुद्ध उलट सुलट बातम्या प्रसिद्ध करीत आहेत या बोगस पत्रकारांना इतर शासकीय कार्यालयात मध्यस्थी आणि दलाली करणारे तसेच कार्यालयात सतत जा ये करणारे, पोलिसांवर राजकीय सामाजिक प्रभाव टाकणारे दिसत नाहीत का ? पोलीस स्टेशनसह प्रत्येक शासकीय कार्यालयात मध्यस्थी, दलाल शासकीय कामा निमित्त आलेल्या नागरिकांकडून चिरीमिरी घेऊन मध्यस्थी करून कामे करून देतात याकडे बोगस पत्रकार जाणून बुजुन दुर्लक्ष करून बांधकाम व्यवसायिकांना, वाळू वाहतूकदारांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे वसूल करत असल्याच्या तक्रारी यावल पोलीस स्टेशन हद्दीत व तालुक्यात वाढू लागल्यानंतर आता अशा पत्रकारांचा डेटा,तो कोणत्या ठिकाणी नियुक्त आहे त्यांच्यावर आणि त्यांच्या संपादकांवर काही गुन्हे दाखल आहेत का? याबाबतची माहिती जनसंपर्क संचलनालय व पोलिसांच्या गोपनीय विभागाकडून गोळा करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.
    त्यामुळे आता भविष्यात पत्रकारितेचा बाजार मांडणाऱ्या तथाकथित पत्रकारांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
     काही पत्रकार नीती भ्रष्ट व भ्रष्टाचाऱ्यांच्या हाता खालचे बाहुले बनुन एखाद्या वर्तमानपत्राचे ओळखपत्र प्राप्त करून दमदाटी करून व धाक दाखवून त्या आधारे वसुली करीत आहेत.त्यासाठी स्थानिक काही
राजकीय नेते,स्वतःला समाजसेवक समजणारे,दलाल, मध्यस्थी पोलिसांना टार्गेट करून आपले दलालीचे मध्यस्थीचे आणि दोन नंबरचे व्यवसाय कसे चालतील आणि आपला  वैयक्तिक हेतू कसा साध्य होईल हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रसिद्धी माध्यमांना टार्गेट करीत आहे.
      अशा पत्रकारांवर,मध्यस्थी करणाऱ्यां आणि अल्पावधीत अवैध संपत्ती संपादन करणाऱ्यांवर भविष्यात कारवाईची टांगती तलवार आहे. अशा प्रकारे यावल शहरातील ग्रामीण भागातील पत्रकारांना चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या एका पत्रकारा विरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला काही वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता आणि आहे. जेलमध्ये हवा खात असताना जेलमधील दुसऱ्या आरोपींनी हाताला/सामनाला तेल लावून त्या आरोपी पत्रकाराचे रात्रभर काय हाल केले होते हे सर्व प्रसिद्धी माध्यमांना चांगल्या प्रकारे ज्ञात आहे.काहींनी तर पत्रकारितेच्या नावाखाली बोगस संघटना स्थापन करून संघटनेचे कोणतेही शासकीय 'ऑडिट' न करता जिल्हाधिकारी जळगाव व संबंधित अधिकाऱ्यांची शुद्ध दिशाभूल व फसवणूक करून वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करून धर्मदाय आयुक्तांकडे कोणताही हिशोब न देता सोयी प्रमाणे आर्थिक प्राप्तीसाठी संघटनेचे काम सुरू ठेवले आहे.शासकीय कार्यालयाकड़े  यांनी दिलेल्या अनधिकृत लेटर पॅडची चौकशी झाल्यास बेकायदा कारभार उघडकीस येईल आणि फौजदारी स्वरूपाचा गंभीर असा गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही.त्यांच्या कृत्याने
लोकशाहीचा चौथ्या स्तंभाला जणू लाचारीची कीड लागल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे तथाकथित बोगस पत्रकारांवर कारवाई हाती घेण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात