यावल दि.19
लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात नियंत्रण अधिकारी, अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी सन 2021 व 2022 मध्ये केलेल्या देखभाल व दुरुस्तीची कामे करताना गैरप्रकार केलेला आहे त्या कामांची चौकशी करण्या संदर्भात नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी तक्रार केली आहे.
दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव मुख्य अभियंता यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात दि.7/7/2022 व दि.16/11/2022 संदर्भांन्वये म्हटले आहे की,कार्यकारी
अभियंता जळगांव पाटबंधारे विभागातील कथीत गैरप्रकार, भ्रष्टाचार व अनियमितता बाबत वेळोवेळ मागणी करीत आहे. परंतु आपल्याकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.नियंत्रण अधिकारी अधिक्षक अभियंता व प्रशासक,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव
यांनी या प्रकारणात गैरप्रकार, भ्रष्टाचार व अनियमितता झाली नाही असं कळविणे ही फार खेदाची बाब आहे.
2021व 2022 मध्ये केलेल्या देखभाल व दुरूस्तीची कामे करतांना झालेल्या गैरप्रकाराची
कोणतीही चौकशी न करता सर्व अभियंते उच्च शिक्षित असल्याचा दावा करून त्यांची चौकशी करण्यात वेळ वाया जाईल असे दाखले दिले व चौकशी न करता त्यांना व भ्रष्टाचाराला पाठवळ दिले असे दिसून येते.
कार्यवाही न करता माझा अर्ज दप्तरी दाखल करून टाकला आहे.उपविभागा मार्फत केलेल्या कामाचे जीपिएस.मॅप्सवर
येणाऱ्या फोटोद्वारे केव्हा व कोठे काम केले.तसेच किती मजूर कामावर होते याचा खुलासा होईल.तसेच कामावर ज्या ज्या ठेकेदारांनी मजूर लावले त्या मजूरांचा एस.आय./पी.एफ. त्यांचे खात्यावर जमा व्हायला
हवा होता.तसे एकाही मजूराचे नांवे रक्कम जमा झालेली नाही. मजूरांची यादी सह रकम जमा केल्याची सही शिक्याराह पोहोच मिळाची ही विनंती.
सचिव,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई व अधिक्षक अभियंता,दक्षता पथक,ठाणे
यांना सुद्धा अर्ज देवून लक्ष घालावे म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे.त्याचा चौकशी अहवाल अद्याप आलेला नाही.ज्यांनी कामे केली.भ्रष्टाचार केला त्यांनाच आपण चौकशी दिली हे योग्य नाही.तसेच ज्यांनी कामे
केली तेच अधिकारी सेवानिवृत्त होवून पुन्हा कामावर रुजू झाले अधिकान्यांशी संगनमताने ही चौकशी दाबण्यात आली.
तरी सेवानिवृत्त अधिकारी ज्यांची चौकशी ज्या अधिकाऱ्यांबद्दल तक्रार आहे त्यांचे पगार पेन्शन तात्काळ थांबवावी अशी माझी मागणी आहे मात्र आपले कार्यालय डोळेझाक करीत आहे तरी आपण चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी असे दिलेल्या तक्रार जात नितीन रंधे यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा