यावल वन विभाग कार्यालयात आणि वनक्षेत्रात सहाय्यक वन संरक्षक हाडपे यांचा वाढदिवस अतिरिक्त डी एफ ओ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा.




यावल दि. 17 
जळगाव येथील यावल वन विभाग कार्यालयात तसेच यावल वनविभाग क्षेत्रात संबंधितांकडून सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांचा वाढदिवस गेल्या दोन दिवसापूर्वी अतिरिक्त डी.एफ.ओ.विवेक होंसींग यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामुळे वन विभागात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
          याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल पूर्व वन क्षेत्रातील फरार झालेल्या आरोपी संदर्भात माहिती घेण्यासाठी दि.15/ 12/ 2022 रोजी जळगाव येथील यावल वन विभाग कार्यालयात अतिरिक्त डी.एफ.ओ.विवेक होंसिग यांची भेट घेण्यासाठी गेलो असता त्यावेळी कार्यालयात सहाय्यक वनसंरक्षक विवेक हाडपे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम सुरू होता. असे असताना अतिरिक्त डीएफओ यांनी कार्यालयीन प्रमुख यांना सांगितले की मीटिंग सुरू असल्याने( मीटिंग सुरू नसताना) भेटण्यास नकार दिला. कार्यालयीन अधीक्षक यांना ओळख दाखवून पुन्हा भेटण्याबाबत चिठ्ठी पाठवली असता व्हीजिट रजिस्टरला नोंद करण्याचे सांगण्यात आले. व्हिजिट रजिस्टरची प्रत्यक्ष पाहणी केली असता जूलै 2022 नंतर दि. 14/ 12/ 2022 या कालावधीत फक्त एका व्यक्तीच्या नावाची नोंद आढळून आली.यामुळे कार्यालयात गेल्या सहा महिन्यात फक्त एका व्यक्तीने भेट दिली का? असा प्रश्न उपस्थित होतो.
        फरार आरोपी संदर्भात अतिरिक्त डी एफ ओ यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे.संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे का असे विचारले असता निलंबनाची कारवाई ही शिक्षा नसते असे सांगितले. तसेच काही तक्रार असल्यास लेखी स्वरूपात तक्रार द्या असे सांगण्यात आले.
           जळगाव येथील यावल वन विभाग कार्यालयात एका अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला याची लेखी परवानगी अतिरिक्त डीएफओ यांनी दिली होती का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असून सहाय्यक वनसंरक्षक विवेक हाडपे यांचा वाढदिवस यावल वनक्षेत्रात आणि कार्यालयात काही खाजगी सॉमिल व लाकूड व्यवसायिकांनी तसेच वन गुन्हे दाखल असलेल्या काही संशयतांनी साजरा केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने याला डीएफओ यांनी परवानगी दिली होती किंवा नाही याची खात्री आता लेखी तक्रार देऊन करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात