यावल शहरातील भुसावळ रोड वरील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित येथील दत्त जयंती निमित्त जयंती,श्री स्वामी समर्थ नाम जप सोहळा मोठ्या उत्साहात,व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पिठाचे पीठासीन श्री गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी यांच्या मार्गदर्शनातून भुसावळ रोड टेलिफोन ऑफिस जवळ श्री स्वामी समर्थ बाल संस्कार व सेवा केंद्र येथे दत्त जयंती निमित्त सात दिवशीय अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताहाची सुरूवात 1 डिसेंबर गुरुवार रोजी करण्यात आली यात गुरुचरित्र पारायण सोहळा विविध देवतांचे यज्ञ मंडपात मांडणी व पूजन तसेच सात दिवस अखंड रात्रंदिवस विना वादन श्री स्वामी समर्थ जप श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे वाचन असे अखंड सात दिवस सुरू राहील यात दिवसा सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत यावल व तालुक्यातील महिलांनी तर संध्याकाळी सात ते सकाळी सात पर्यंत तर पुरुषांनी अखंड नामजप सप्ताहात मोठ्या उत्साहाने यावल शहरातील व तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित आहे.
प्रत्येक दिवशी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे यात पहिल्या दिवशी ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी,अग्नी प्रदीपण व दुसऱ्या दिवशी मंडळ स्थापना, अग्नी स्थापना ,स्थापित देवता हवन तिसऱ्या दिवशी नित्य सहकार गणेश याग मनोबल, चौथ्या दिवशी नित्य सहकार चंडी याग,स्वामी याग,रुद्र मल्हार याग, बली पूर्ण होती व नंतर सत्यदत्त पूजन,देवता विसर्जन व अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आहे.तसेच यावल तालुक्यात किनगाव,सांगवी,साकळी,डाभुर्णी मिनी सप्ताह घेण्यात येत आहे तेथेही गुरुचरित्र पारायण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे.
हेही बातमी वाचा: रावेर तालुक्यातील कोचूरच्या तरुणाच्या खून प्रकरणी दोघही संशयीतांची निर्दोष मुक्तता
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : रावेर शौचालय घोटाल्यातील आरोपींनी जमा केले 10 लाख रुपये, तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांची माहिती
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास १० डिसेंबरला रावेर येथे राष्ट्रवादीतर्फे रास्तारोको आंदोलन निवेदनाद्वारे दिला ईशारा
👉हेही व्हिडिओ बातमी पहा : रावेर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतिच्या सरपंच पदासाठी 37 व सदस्य पदासाठी 165 अर्ज दाखल
8 डिसेंबर रोजी सकाळी भूपाळी आरती सत्यदत्त पूजन व त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महानैवेद्य आरती अखंड नामजप यज्ञ सप्ताह समारोप होईल.या शब्दात याप्रसंगी स्वामी समर्थ केंद्रातील प्रमुख प्रतिनिधींनी सेंद्रिय शेती सामूहिक सामुद्रिक शास्त्र पर्यावरण प्रकृती विवाह संस्कार व पशुसंवर्धन मुलांवर संस्कार कसे करावे या विविध विषयांवर मार्गदर्शन व आपल्या जीवनात विविध समस्या येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन ह्या विविध विषयावर सात दिवस वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे
या सप्ताहात अखंड चालणाऱ्या
श्री स्वामी समर्थ नाम जप, विन वादन , व स्वामी चरित्र ग्रंथ वाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिनिधी व सेवेकरी याच्या कडून करण्यात येत आहे
यासाठी केंद्र प्रमुख ता.प्रतिनिधी केंद्र प्रतिनिधी व तसेच कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र यावल केंद्रातील सेवेकर्यांनी परिश्रम घेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा