थर्टी फर्स्ट निमित्त जिल्ह्यात 51 तपासणी नाके; चौका चौकात कडक बंदोबस्त. परंतु पोलीस अधीक्षक साहेब बनावट देशी व इंग्लिश बनावट दारूचे काय...?




यावल दि. 31
सन 2023 नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अनेकांनी जय्यत तयारी केली आहे,मात्र नववर्षाचे जंगी स्वागत करताना जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सावधानतेचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यात विविध भागात एकूण 1 हजार 248 पोलिसांचा बंदोबस्त थर्टी फर्स्टच्या रात्री रस्त्यावर राहणार असला तरी मात्र यावल शहरासह तालुक्यात आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मद्यपी यांच्या आरोग्यास हानिकारक अशी पन्नीची दारू व बनावट देशी क्वार्टर आणि इंग्लिश बनावट क्वार्टर सर्रासपणे जागोजागी असलेल्या अनेक परमिट रूम व ढाब्यांवर खुलेआम विक्री होत आहे त्याचे काय...? असा प्रश्न समाजात उपस्थित केला जात आहे.
        यावल तालुक्यात बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गाला लागून असलेल्या खेड्यापाड्यावर आणि इतर प्रमुख गावांमध्ये आरोग्यास अत्यंत घातक अशी देशी दारूचे क्वार्टर पॅक करून विक्री करण्याचे उद्योग खुलेआम सुरू बनावट देशी दारू क्वार्टर 48 नग असलेला खोका 1 ते दीड हजार रुपयात अनेक परमिट रूम बियरबार चालकांना व इतर खाजगीरित्या विक्री करणाऱ्यांना सर्रासपणे विक्री होत आहे.आणि बाजारात अनेक परमिट रूम बियर बार मध्ये व ढाब्यावर तसेच गल्लीबोळात खुलेआम एक कॉटर 60 ते 70 रुपयाला ग्राहकाला विक्री होत आहे.
हे यावल शहरासह जिल्ह्यातील अनेक पोलिसांना आणि उत्पादन शुल्क विभागाला चांगल्या प्रकारे ज्ञात असताना सुद्धा आरोग्यास हानिकारक अशी 'पन्नी'ची व बनावट देशी आणि इंग्लिश बनावट 'कॉटर' विक्री होते हे समाजाचे फार मोठे दुर्भाग्य असल्याचे समाजात बोलले जात आहे यासाठी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी उत्पादन शुल्क विभागासह संयुक्त मोहीम राबवून जिल्ह्यात आज थर्टी फर्स्ट या दिवशी आणि इतर दिवशी सतत कारवाई करून बनावट देशी दारू 'पन्नी' ची दारू व बनावट इंग्लिश 'क्वार्टर' विक्रेत्यांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.काही हॉटेल व परमिट रूम बिअर बार चालक हे अधिकाऱ्यांचे दलाल व पंटर बनवून मद्यपी लोकांचे आर्थिक व शारीरिक आरोग्याचे शोषण करीत आहेत यांचा सुद्धा बंदोबस्त पोलीस अधीक्षक यांनी आपल्या गोपनीय खात्यामार्फत करून कडक कारवाई करावी अशी सुद्धा मागणी होत आहे.
          यावल तालुक्यासह सावदा तालुका रावेर व संपूर्ण भुसावल परिसरात पन्नीची दारू,बनावट देशी दारू,इंग्लिश बनावट दारूचे क्वार्टर सर्रासपणे विक्री होत आहे बनावट देशी दारू पनीचे दारू इंग्लिश बनावट कॉलर यांच्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे आणि होणार आहे तसेच अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत अशाप्रकारे समाजाला घातक असलेल्या या उद्योगात एका नावाजलेल्या वाईन सेंटर मालकाचा प्रामुख्याने उल्लेख होत असल्याने याकडे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष का? होत आहे हा मोठा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात