यावल दि. 31
भिकाऱ्याने काढलेल्या 4 कोटी रुपयांच्या विम्यासाठी दोघांची हत्या,बनावट पत्नीसह 6 जणांनी लाटले चार कोटी, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विमा क्षेत्रात आणि नाशिक विभागात गुन्हेगारी क्षेत्रात पोलिसांना नवीन धडा मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,विमा कंपनीतून चार कोटी रुपये लाटण्यासाठी नाशिकच्या सोनेरी टोळीने दोन जणांचे खून केलेत.त्यात पहिला खून रामकुंडावरील एका दारुड्या भिकाऱ्याचा तर दुसरा खून अशोक भालेराव नावाच्या व्यक्तीचा करण्यात आला.या हत्येच्या प्रकरणात खून झालेल्या भिकाऱ्याच्या बनावट पत्नीसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.या वर्षातली तसेच नवीन 2023 वर्षाच्या पूर्वसंध्येला गुन्हेगारीची ही नवीन पद्धत भल्याभल्यांना चक्रावून टाकणारी आणि पोलिसांना गुन्हेगारीचा नवा 'धडा' शिकवणारी आहे. असा लागला घटनेचा तपास-सन 2021 च्या सप्टेंबर मध्ये अशोक रमेश भालेराव नावाच्या व्यक्तीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला असता. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला त्याचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी अपघात अशी नोंद केली होती.मात्र मयताच्या भावाने हा घातपात असल्याचं पोलिसांना सांगितल्याने पुन्हा एकदा तपास करण्यात आला असता विम्याचे पैसे लाटण्या साठी हा खून करण्यात आल्याचं समोर आला.
मयत अशोक भालेरावने 2019 पासून विमा कंपन्याकडून 10 वेगवेगळ्या पॉलिसी घेतल्या होत्या.यात भालेरावच्या जागी बनावट इसमाचा मृत्यु दाखवून कोट्यवधीचा विमा लाटण्याचाचा प्लान करण्यात आला होता. यासाठी 2021च्या फेब्रुवारी महिन्यात गंगाघाटावरील एका भटक्या भिकाऱ्याला शोधण्यात आले.त्याला एका स्कॉरपीओ चार चाकी गाडीत टाकुन त्याची म्हसरूळ परिसरात हत्या करण्यात आली.विमा काढतांना मात्र वय आणि इतर गोष्टी जुळत नसल्याने हा प्लॅन फसत असल्याचे 6 जणांच्या लक्षात आल्याने.अखेर या टोळीचा प्रमुख सूत्रधार मंगेश सावकार याने कटाचा भाग असलेल्या मयत भालेरावचाच काटा काढला. आणि अपघाताचा बनाव करून 4 कोटी 10 लाख रुपये संशयित बोगस पत्नी रजनी उकेच्या अकाउंटवर जमा झाल्यानंतर ते त्यांनी आपसात वाटून घेतले.
चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या प्रकरणात मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार,रजनी प्रणव उके,प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या सावकारच्या दुचाकीच्या डिक्कीत पिस्टल आणि 6 काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.फिर्यादी भालेराव यांचा भाऊ आहे आणि त्याला यांच्यावर संशय होता.त्याच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार उघड करण्यात आला.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हे 6 आरोपी जेलची हवा खात आहेत आहेत.त्यांनी याच पद्धतीने अजूनही इतर काही गुन्हे करून विम्याची रक्कम हडपण्यात आली आहे किंवा कसे याबाबत नाशिक पोलीस तपास करीत आहेत.
तब्बल 2वर्षांनी या प्रकरणाचा तपास लागला आहे.या घटनेमुळे पोलिसांमध्ये नोंदवले जाणारे नैसर्गिक मृत्यू व अपघाताचे झालेले मृत्यू हे गुन्हेगारीचा वेगळा भाग असू शकतात हे समोर आले आहे.सन 2022 वर्ष अखेर पोलिसांना हा नवीन 'धडा' शिकावयास मिळाला एवढे मात्र खरे.
टिप्पणी पोस्ट करा