अप्पर जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी फैजपुर यांचा आदेश यावल तहसीलदार महेश पवार, यावल भाग मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी कचराकुंडीत टाकत एका महिला शेतकऱ्याचा शेती रस्ता मोकळा करून न दिल्याने महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव हेमंत डांगे यांनी तक्रारीची दखल घेत दि.11ऑक्टोंबर 2022 रोजी जळगाव अपर जिल्हाधिकारी यांना कार्यवाहीचे आदेश काढल्याने तसेच तहसीलदार महेश पवार यांचा त्यांच्या कार्यकाळातील कार्यालयीन कामकाजाचा आढावा लक्षात घेता तहसीलदार यांना आपल्या पदाचा आणि अधिकाराचा माज आलेला आहे का?असे अनेक प्रश्न यावल तालुक्यातील राजकारणात समाजात उपस्थित केले जात आहेत.
याबाबत सविस्तर आणि अधिकृत माहिती अशी की दि.7/ 11 / 2016 रोजी तत्कालीन तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडे अर्जदार कल्पना मुरलीधर मंडपे यांनी यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील गट नंबर 199 व 202 मधून शेती मशागतीसाठी व उत्पन्नाचा माल वाहतुकीसाठी बैलगाडी,ट्रॅक्टर द्वारे वापरण्यायोग्य रस्त्याची मागणी केली होती ती मागणी तत्कालीन तहसीलदार कुंदन हिरे यांनी सन 2016 मधे लेखी आदेशान्वये तात्काळ मान्य केली होती आणि आहे.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
यानंतर बोरावल खुर्द येथील सुमनबाई नारायण इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग यांच्याकडे अपील दाखल केले असता उपविभागीय अधिकारी यांनी दि. 2/12/ 2018 रोजी आदेश पारित करून प्रकरण नमूद मुद्द्याच्या आधारे फेर चौकशी करून गुणवत्तेवर निर्णय पारित करण्यासाठी पुन्हा यावल तहसीलदाराकडे प्रकरण पाठविले असता यावल येथील तहसीलदार महेश पवार यांनी दि. 2/8/2021 रोजी रस्ता मागणीचा अर्ज नामंजूर केला.
म्हणजे दि.7/11/2016 रोजी तत्कालीन तहसीलदार कुंदन हिरे यांनी तक्रारदार यांची रस्त्याची मागणी लेखी आदेशान्वये मान्य केलेली असताना विद्यमान तहसीलदार महेश पवार यांनी दि.2/8/2021 रोजी नामंजूर केली.
यामुळे मूळ अर्जदार कल्पना मुरलीधर मंडपे यांनी यावल तहसीलदार यांच्या निर्णयाविरुद्ध उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग यांच्या न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला असता दि. 20/3/2022 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी आदेश पारित करून उत्तरार्थी कल्पना मंडपे यांचा अर्ज मंजूर केला.
यानंतर पुन्हा यमुनामाई निळे यांनी अपर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग यांच्या कडील दिनांक 20/03/2022 च्या मंजूर झालेल्या आदेश स्थगितीसाठी अर्ज केला असता अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी यमुनाबाई निळे यांचा अर्ज दि.21/7/2022 रोजी नामंजूर केला.
यानंतर तहसीलदार महेश पवार यांनी दि.3/10/2022 रोजी यावल भाग मंडळ अधिकारी शेखर तडवी यांना रस्ता मोकळा करण्याचा आदेश दिला, त्यानुसार मंडळ अधिकारी यांनी अर्जदार कल्पना मंडपे यांना व सामनेवाला सुमनबाई निळे यांना रस्ता मोकळा करणे बाबतच्या कार्यवाही बाबत लेखी कळविले परंतु दि.18/10/2022 रोजी मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी यावल तहसीलदार यांच्या दिलेल्या तोंडी आदेशाने रस्ता मोकळा करून दिला नाही.
रस्ता मोकळा करून न दिल्याने यावल तहसीलदार महेश पवार,यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी अपर जिल्हाधिकारी जळगाव व उपविभागीय अधिकारी फैजपुर यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याने तसेच रस्ता मोकळा करून न दिल्याने अर्जदार कल्पना मुरलीधर मंडपे यांनी दि. 6/9/2022रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली या तक्रारीनुसार दि.11ऑक्टोंबर 2022 रोजी महसूल व वन विभागाचे अवर सचिव हेमंत डांगे यांनी यावल तहसीलदार महेश पवार यांनी वहिवाटीचा रस्ता खाली करून दिला नाही म्हणून तसेच याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांना काढल्याने यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह मंडळ अधिकारी शेखर तडवी यांच्यावर आता काय कार्यवाही होणार? किंवा अर्जदार कल्पना मंडपे यांच्या मागणीनुसार शेत रस्ता मोकळा करून मिळणार आहे का? तसेच एका शेतकरी महिलेला न्याय देताना तहसीलदार महेश पवार यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा मांज दाखविला हे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने तहसीलदार महेश पवार यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कार्यालयीन कामकाजाचे निर्णयाची चौकशी किंवा ऑडिट झाल्यास फार मोठा शासकीय भोंगळ कारभार गैरप्रकार अनियमितपणा उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे यावल व रावेर तालुक्यात महसूल विभागात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा