अहमदनगर येथील रमेश सब्बन यांचे निधन.

                           निधन वार्ता

                           रमेश सब्बन
 
अहमदनगर येथील रमेश नरसय्या सब्बन याचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि.11नोव्हेबर2022 रोजी दु. 12.30 ला दुखःद निधन झाले.                          
अहमदनगर येथील रमेश नरसय्या सब्बन (वय 95 ) निवृत्त प्रशासकीय अधिकारी,कृषी विभाग,महाराष्ट्र शासन,पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक व माजी उपाध्यक्ष.कृषी विभागात प्रदीर्घ सेवा केली.तेअत्यंत प्रामाणिक,कर्तव्यदक्ष निस्पृह,करारी,अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने शासकीय व सार्वजनिक जिवनात कार्यरत राहीले.संपूर्ण कृषी खात्यात त्याच्या निस्पृह प्रमाणिक कार्याची दखल सतत घेतली जात असे.सामाजिक  कार्यात हिरहिरीने सहभागी होत होते वयाच्या शेवट पर्यत त्यांनी शैक्षणिक कार्यात मोठा सहभाग घेतला.नवनाथ पंथी चैतन्य देवेंद्रनाथ याचे आवडते परम शिष्य होते.नवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिवपदही त्यांनी सांभाळले.सिध्दांतीक जीवन शैली मुळे अनेक क्षेत्रातील मित्र परीवार मोठा चाहता होता.   त्याच्य पश्चात भाऊ,दोन मुले,दोन मुली,सुना,पुतण्या,पुतण्या,नातू,
पणतू असा मोठा परिवार आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन व सब्बन ऑटोमोबाईलचे चालक शिरीष सब्बन याचे वडील होत. नुकतेच त्याच्या थोरल्या मुलाचे निधन झाले होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात