श्रीक्षेत्र कपलीधार येथे सहकार मंत्री अतुल सावे यांचे हस्ते शिवा संघटनेचा शिव भूषण पुरस्कार वितरण संपन्न. सावदा येथील पत्रकार कैलास लवंगडे सन्मानित.



यावल दि.9 
महाराष्ट्र, तेलंगाणा,आंध्र प्रदेश व कर्नाटक मधील लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बीड जिल्ह्यातील कपलीधार येथे दि. 7 रोजी शिवा संघटनेचा राष्ट्रीयस्तरावरील शिवा भूषण पुरस्कारांचे वितरण राज्याचे सहकार मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे यांचे हस्ते व शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न झाले लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्याना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले,यावेळी लिंगायत समाजाचे राष्ट्रीय संत शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, गुरुवर्य शिवानंद शिवाचार्य महाराज, गुरुवर्य महादेव स्वामी महाराज गुरुवर्य म्हैसाळकर महाराज, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे,यांचे उपस्थित संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांचे संजीवन समाधी मंदिरात शासकीय पूजा संपन्न झाली. 
       यानंतर सहकार मंत्री अतुल सावे व प्रमुख मान्यवरांचे हस्ते शिवा भूषण राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील पत्रकार कैलास लवंगडे यांना देखील शाल श्रीफळ व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, सामाजिक,व्यापारी,शेतकरी याचे सह विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा देखील यावेळी गौरव करण्यात आला यावेळी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारीअजित पवार,जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,यांचा संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी बसवराज मंगरुळे, राजेंद्र मस्के,अक्षय मुंदडा,शिवा) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे,वसंत मुंडे यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमास ठिकठिकाणाहून आलेले समाज बांधव तसेच बीड जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते तर शिवा भूषण राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल कैलास लवंगडे यांचे सावदा व परिसरातून विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात