कर्तव्यात कसूर,दप्तर दिरंगाई प्रभारी कार्यकाळामुळे कर्तव्यदक्ष बीडिओचा बळी. जि.प.सिओ कडून यावल पं.स.कामकाजाची चौकशी करून कारवाईची मागणी.




यावल दि. 24
यावल पंचायत समितीचा कारभार गेल्या 2 ते 3 वर्षापासून प्रभारी गटविकास अधिकारी तसेच सात-आठ वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या एका विस्तार अधिकाऱ्याच्या भरोशावर आणि मार्गदर्शनाखाली सुरू असल्याने तसेच पंचायत समिती मधील कामकाजामध्ये मर्जीनुसार आणि सोयी प्रमाणे दप्तर दिरंगाई,कर्तव्यात कसूर इत्यादी कारणांमुळे महत्त्वाची कामे व निर्णय रेंगाळल्यामुळे तसेच माहिती अधिकाराची प्रकरणी पंचायत समिती स्तरावर जाणून बुजून निकाली न काढल्यामुळे अनेक प्रकरणे माहिती आयुक्तांपर्यंत गेल्यामुळे या शासकीय कामकाजाच्या गोंधळात मात्र नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष माहितगार असे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा बळी गेला यामुळे जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अधिकारी यांनी यावल पंचायत समिती भोंगळ कारभाराची,कामकाजाची चौकशी करणे कामी एक उच्चस्तरीय समिती नेमून पुढील कारवाई करावी असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
          यावल पंचायत समितीच्या गेल्या सात ते आठ वर्षाच्या कार्यकाळात गटविकास अधिकारी वाय.पी.सपकाळे निलेश पाटील यांच्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षापासून गट विकास अधिकारी म्हणून प्रभारी राज सुरू होते आणि आहे.ग्रामीण भागात गुरांचे गोठे,घरकुल, यांच्यासह इतर विविध योजना संदर्भात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत.
          जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते,गटारी,शौचालये,स्मशानभूमी नालाबांध,शेततळे,गोठे,दलित वस्तीतील कामे तसेच शिलाई मशीन,ताडपत्री,रोजगार हमीची कामे इत्यादी विकास कामे योजना राबविल्या जातात याबाबत तालुक्यातून अनेक तक्रारी आहेत,मागासवर्गीय 20 टक्के निधीचा अहवाल पाठविताना संबंधित कर्मचारी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्यांसह जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत आहे,परंतु वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेची पिळवणूक करीत तक्रारीचे निरसन होत नाही.कार्यालयीन अनेक प्रकरणे कामकाज प्रलंबित आहेत अनेक वेळा वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत पंचायत समिती सदस्य तथा गटनेते शेखर पाटील यांनी यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत काही कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत तोंडी लेखी तक्रारी केलेल्या असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत, याकडे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी अद्याप पावतो लक्ष केंद्रित न केल्याने यावल पंचायत समिती कार्यालयीन कामकाजामध्ये मोठा भोंगळ कारभार सुरू आहे काही कर्मचारी सात ते आठ वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असल्याने ते प्रभारी गटविकास अधिकारी यांची शुद्ध दिशाभूल व आपल्या सोयीनुसार शासकीय कामकाज करीत असल्याने काही ग्रामसेवकांसह,ठेकेदारांमध्ये, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
          माहितीचा अधिकार अंतर्गत ग्रामसेवकाकडे माहितीचा अर्ज केल्यानंतर ग्रामसेवक माहिती देत नाही,त्यानंतर प्रथम अपील गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी हे संबंधित ग्रामसेवकाशी समन्वय साधत प्रथम अपील अर्जाची सुनावणीचे कामकाज मुदतीत गटविकास अधिकारी यांच्या दालनात कधीच वेळेवर करीत नाहीत.माहिती अधिकार अंतर्गत आजही अनेक प्रकरणी प्रलंबित आहेत,तसेच गेल्या सात-आठ वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मानून असलेला कर्मचारी गट विकास अधिकारी यांची दिशाभूल करीत माहिती देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे माहिती मागणाऱ्या व्यक्तीस नाशिक माहिती आयुक्त यांच्याकडे द्वितीय अपील दाखल करावे लागत आहे आणि यात मात्र प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांना तसेच जन माहिती अधिकारी यांना जाब द्यावा लागत आहे अशाच प्रकरणांमुळे कारण नसताना आणि काही संबंध नसताना प्रभारी कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे  नाशिक येथे माहिती आयुक्तांकडे सुनावणीसाठी जात असताना अपघातात त्यांचा बळी गेला ही दुर्दैवी घटना म्हणजे यावल पंचायत समिती कार्यालयीन शासकीय कामकाजात काही कर्मचाऱ्यांकडून होत असलेली दप्तर दिरंगाई,कर्तव्यात कसूर आणि मनमानी कारभारामुळे आणि एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्याकडून झाली आहे का? एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांना नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? याची चौकशी तपास करणे कामी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून कडक कारवाई करावी.तसेच यावल पंचायत समिती कार्यालयात अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्यांची तात्काळ यावल येथून बदली करावी किंवा त्यांना इतर ठिकाणच्या  (फौजदाराचा हवालदार करून ) कामकाजाचा टेबल द्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
            दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर ? -
यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून डॉ. मंजुश्री गायकवाड यांची नेमणूक झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त होते आणि आहे आणि त्या सोमवार दि. 21 नोव्हेंबर 2022 यावल पंचायत समितीच्या कायम बीडिओ म्हणून  पदभार स्वीकारणार होत्या.मात्र त्या सोमवारी हजर झाल्या नाहीत आणि त्यामुळे यावल पंचायत समितीचे कामकाज प्रभारी बीडिओ एकनाथ चौधरी यांच्याकडेच राहिला आणि योगायोगाने त्यांचा अपघातात बळी गेला.याला सुद्धा शासकीय कामकाजात दिरंगाई म्हणायची का ?असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
         यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी एकनाथ चौधरी यांचीच कायमस्वरूपी बीडिओ म्हणून नियुक्ती होणार होती परंतु याआधी यावल पंचायत समितीच्या प्रभारी बीडिओ म्हणून राहिलेल्या डॉ.मंजुश्री गायकवाड यांची यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून कायम नियुक्ती होण्यासाठी ऐनवेळी राजकारणातून संकेत मिळाल्याची जोरदार चर्चा राजकारणात सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात