यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज बुधवार दि.23 नोव्हेंबर 22 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने यावल येथून नाशिक येथे शासकीय गाडी एम.एच.19-डी. व्ही.4199 या गाडीने कामासाठी जात असताना तसेच सुरू असलेल्या अमावस्येच्या अशुभ वेळेवर अमळनेर तालुक्यातील बोहरा फाट्याजवळ पावणे सहा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात जागीच ठार झाले तर गाडीवरील ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे,भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याने तसेच गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे क्लीनर साईडला बसलेले होते त्याबाजूने गाडी ट्रकवर आदळली गेली त्यात ते जागीच गतप्राण झाले.
हेही वाचा : - रावेर तालुक्यातील "त्या" ग्रामसेवक,सरपंच वर कारवाई करा अन्यथा...रस्ता रोकोचा राजुभाऊ सूर्यवंशी यांचा इशारा
एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते मीत भाषी व नेहमी कामाशी काम ही वृत्ती ठेवणारा एक चांगला अधिकारी अपघातातून निघून गेला एक महिन्यातच यावल पंचायत समितीतील सर्व बहुतेक काम त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेली होती यावल येथेच त्यांना पंचायत समितीच्या कार्यभार मिळावा म्हणून यावल तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नामदार गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करीत होते.
टिप्पणी पोस्ट करा