महाराष्ट्रात तात्काळ 'लव्हजिहाद विरोधी कायदा' तसेच 'धर्मांतर विरोधी कायदा' लागू करावा,अशी मागणी केली हिंदू जनजागृती समितीने. आंदोलन करत यावल तहसीलदारांना दिले निवेदन.





यावल दि.18
श्रद्धा वालकर या हिंदु युवतीचे 35 तुकडे करून निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबला तात्काळ फासावर लटकवावे,तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असा 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' करावा.याबाबत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने यावल येथे आज दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाच्या घोषणा देत आंदोलन करून यावल तहसीलदारास निवेदन दिले.
         दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पालघर येथील आफताब पुनावाला हा नराधमाने श्रद्धा वालकर या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून
तिच्यासोबत 'लिव इन' मध्ये रहात होता.श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यावर आफताबने तिचे 35
तुकडे करत निघृणपणे हत्या केली.ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतींमध्ये दहशत निर्माण
करणारी आहे. या घटनेतून लव्ह जिहादी आफताबची वासनांधता, क्रूरता आणि विकृत मानसिकता दिसून येते.या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट पसरलीआहे. ही केवळ पहिली घटना नसून काही दिवसापूर्वी मुंबईतील
टिळकनगर येथे रहाणारी रुपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला,म्हणून तिचा पती इक्बाल मोहम्मद
शेख याने तिची गळा चिरून हत्या केली होती.अशाच लव्ह जिहादच्या घटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावतीसह
राज्यभरात उघडकीस आल्या आहेत.एकूणच राज्यात दिवसेंदिवस 'लव्ह जिहाद' ची समस्या गंभीर रूप धारण करत
आहे.खोटे नाव आणि खोटी ओळख सांगणे,फसवणे,महागडी गिफ्ट देणे,रहाणीमान चांगले दाखवणेआदी अनेक
माध्यमांतून हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतर करण्यात येते,त्यानंतर त्यांच्याशी 'निकाह' केला जातो.यामध्ये हिंदू युवतींचे भयंकर शोषण केले जाते. तरी या अत्यंत गंभीर समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्रात तात्काळ 'लव्ह जिहाद विरोधी कायदा', तसेच 'धर्मांतर विरोधी कायदा' लागू करावा, या मागणीसह 1) श्रद्धा वालकरची 35 तुकडे करून हत्या करणाऱ्या लव्ह जिहादी नराधम आफताबला तत्काळ फासावर लटकवावे.2. या हत्येचा तपास करतांना हत्या करण्याचा उद्देश जाणून घेतला पाहिजे. नराधम आफताबने आणखीन काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची माहिती आहे.त्या प्रकरणांचीही चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी.3.राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे 'लव्ह जिहाद'चा प्रकार तर नाही ना,याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमावे.4.राज्यात लवकरात लवकर 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' आणि 'धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा.5.'लव्ह जिहाद'ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची
विशेष शाखा स्थापन करावी. अशा प्रकरणां मध्ये 'लव्ह जिहाद'च्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत.6. 'लव्ह जिहाद' साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी
होणारा वापर यांचीही शासनाने चौकशी करावी आणि त्यात सापडलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी.7. लव्ह जिहाद प्रकरणांत मदरसे आणि मशिदी यांचा संबंध आढळून आल्यास त्यांवर तत्काळ बंदी घालण्यात यावी.
अशाप्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत यावल तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन हिंदू जनजागृती समितीने मागणी केली.
        निवेदनावर हिंदू जनजागृती समिती जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांच्यासह माधवराव फेगडे, आकाश लोणारी,दीपक फेगडे, कोमल इंगळे,ऋषिकेश महाजन, सागर संतोष बारी,कमलाकर जाधव,मनीष राजेंद्र चौधरी,विनय भोई,रघुराज पाटील,हितेंद्र महेश्री सिद्धांत दारू,भैय्या महाजन, राहुल कोळी,धनराज कोळी, प्रकाश कोचरे,एस के पाटील, राहुल तडवी,सुरज पाटील,गणेश नितीन पाटील,प्राजक्ता पुंडलिक पाटील,कमलेश हेमंत शिर्के लोकेश फेगडे, पियुष भोईटे राजेश्वर बारी,मनोज बारी,योगेश वारूळकर,मयूर शिर्के,गौरव कोळी,नंदू कदम,पंकज वायकोळे, दिगंबर भोळे,सरफराज तडवी, मोहन निलेश भोईटे ज्ञानेश्वर कोळी निलेश बेलदार हितेंद्र कुमार ज्ञानेश्वर मराठी सुधाकर धनगर पितांबर फेगडे कुणाल उंबरकर मयूर महाजन,नयन पाटील,अभिषेक बारी,हर्षल बारी, अतुल बडगुजर,भूषण कोळी, यांच्यासह इतर अनेक तरुणांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात