यावल तालुक्यातील डोंगरदे व ईटवा या आदिवासी पाड्यांवर क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आश्रय फॉउंडेशन तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संपर्क पंधरवाडा अभियानांतर्गत आदिवासी बांधवांसोबत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगदे यांच्या हस्ते भारत मातेच्या व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच या आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी नागरिकांच्या असलेल्या समस्या जाणून घेतल्या भविष्यात यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी प.पू.स्वामी स्वरूपानंद जी महाराज,काशिराम बारेला सर,दिलीप कोकणी, दिनेश बारेला,आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा