यावल तहसील कार्यालयात कोणत्याही ठिकाणी माहिती अधिकाराचा फलक आणि माहिती अधिकार 2005 मधील कलम 4 अन्वये कुठेही फलक न लावल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याने यावल तहसील कार्यालयाला माहितीचा अधिकार आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची एलर्जी आहे का ? अशा प्रश्न यावल तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांना पडला आहे? जनतेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव आणि उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी आपले लक्ष केंद्रित करून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
माहिती अधिकाराचा अधिनियम झाल्यापासून 120 दिवसाच्या आत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 (1) ( क ) ( ख ) व इतर कलमान्वये व तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालयात दर्शनी भागावर माहिती अधिकार अंतर्गत तपशील जनतेच्या माहितीसाठी माहितीचा फलक आवश्यक आहे.
परंतु यावल तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांनी माहिती अधिकारातील तरतुदीनुसार कोणताही फलक लावलेला नसल्याने तहसील कार्यालयाला माहिती अधिकाराची एलर्जी आहे का ? असा प्रश्न संपूर्ण यावल तालुक्यात सर्व स्तरात उपस्थित केला जात आहे.तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास शासकीय कामाव्यतिरिक्त येणाऱ्या इतर सर्व रिकामटेकड्या व मध्यस्थी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी रास्ता पेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा