यावल शहरासह ग्रामीण भागात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.




यावल दि.1
यावल तालुक्यातील कोळवद येथे सरदार वल्लभ भाई पटेल प्रतिष्ठान यावल तालुका वतीने डॉ.तथा समाजसेवक कुंदन फेगडे तसेच यावल शहरात आमदार शिरिषदादा चौधरी यांच्यासह न्यू एकता दुर्गोत्सव मंडळ आयोजित उत्सव समिती अध्यक्ष राजेश करांडे यांच्या शुभहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त भव्य शोभा यात्रा काढून मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
        सोमवार दि.31ऑक्टोंबर 2022 रोजी यावल येथील डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी राजकीय व सामाजिक समन्वय साधत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शोभायात्रेत उपस्थित राहून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.

हेही वाचा : - यावल तालुक्यातील महेलखेडीतील 25 वर्षीय तरुणाची घटस्फोट झाल्याच्या नैराश्येतून आत्महत्या

हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


व शोभायात्रेत सहभागी झाले या प्रसंगी जिल्हा परिषद माजी सभापती हर्षल पाटील,जिल्हा परिषद सदस्या सविताताई भालेराव,योगेश भंगाळे,सलीम तडवी सर,याकूब तडवी,प्रल्हाद चौधरी,सौ.मनीषाताई चौधरी, संजू कोळी,भगवान पाटील,  सौं.मंगलाताई महाजन, सौ.मनीषाताई भिरूड,दिपक पाटील,अजय वारके,तुषार चौधरी,इ.उपस्थित होते तसेच वड्री तालुका यावल येथील सरदार वल्लभाई पटेल मित्र मंडळ यांच्या वतीने लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेस उपस्थिती राहून लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले,यावेळी हर्षल पाटील,सौ. सविताताई भालेराव,योगेश भंगाळे,डॉ. कुंदन फेगडे,अजय भालेराव,पंकज चौधरी इ उपस्थित होते.
          याच प्रमाणे यावल शहरात यावल शहरात अखंड भारताचे शिल्पकार,लोह पुरुष,सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दि.31 रोजी सायंकाळी 5  वाजता आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत व त्यांच्या शुभ हस्ते तसेच न्यु एकता दुर्गोत्सव मंडळातर्फे आयोजित उत्सव समिती अध्यक्ष राजेश करांडे यांनी सालाबाद प्रमाणे प्रतिमा पुजन करण्यात आले.त्या प्रसंगी प्रतिमा पूजन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्षआमदार शिरीषदादा चौधरी,शेखर दादा पाटील,उत्सव समिती अध्यक्ष राजुभाऊ करांडे,उपाध्यक्ष चेतन फेगडे,खनजिंदार कुंदन करांडे, भरतदादा महाजन,माजी नगराध्यक्ष राकेश कोलते,राजु महाजन,धिरज महाजन,प्रमोद नेमाडे,नितीन महाजन,महेश खाचणे,कदिरखान,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व सर्व समाज बांधव आणि शहरातील मित्र परिवार उपस्थित होते,या कार्यक्रमासाठी न्यु एकता दुर्गोत्सव मंडळ व सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले..

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात