येथील ग्रामीण रुग्णालयाचे ऑडिट सुरू आहे ऑडिट खर्च म्हणून किंवा ऑडिट संबंधित अधिकाऱ्यांना देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सर्व आरोग्य सहाय्यक व इतर कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक 5 हजार रुपयाची वर्गणी गोळा केली जात असल्याने संबंधित त्या एका डॉ.बाबत यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे ऑडिट सुरू आहे ऑडिट खर्चासाठी ग्रामीण रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयाची मागणी सक्तीने केली जात असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण कामकाज पारदर्शकतेने पार पडत असेल तर ऑडिट खर्च का वसूल केला जात आहे? किंवा रुग्णालयातील कामकाजाबाबत औषधी आवक, वितरण बाबत आणि इतर कामकाजाबाबत अनियमितपणा किंवा गैरप्रकार असल्यास त्याला ग्रामीण रुग्णालयाचे इतर आरोग्य कर्मचारी जबाबदार आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असून प्रत्येकी 5 हजार रुपये गोळा करण्याचे षडयंत्र थांबवून कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देऊ नका असे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा