यावल शहरात आज दि.17 रोजी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील 3 तलाठ्यांनी वाळूने भरलेल्या 2 ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता ट्रॅक्टर सुसाट वेगाने धावताना तसेच 4 ते 5 लोक अपघातापासून बचावल्याचे दृश्य सुदर्शन चित्रमंदिर चौकातील नागरिकांनी सिनेमा स्टाईलरित्या बघितले परंतु या घटनेत ट्रॅक्टर चालकांवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रकरण गुलदस्त्यात अडकल्याची जोरदार चर्चा संपूर्ण यावल शहरात सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरात यावल तलाठी कार्यालयातून पासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर एक तासापूर्वी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर सुसाट वेगाने धावत होते यात चार ते पाच लोक अपघातात बाल बाल बचावले ट्रॅक्टर सुसाट वेगाने होते कारण त्यांच्या मागे तालुक्यातील 3 तलाठी (यावल सर्कल तडवी आणि यावल तलाठी कोळी साहेब वगळता) ट्रॅक्टरचा पाठलाग करीत होते परंतु या घटनेत शेवटी मोठी तडजोड़ झाल्याची जोरदार चर्चा सुदर्शन चौकात अजुन सुरू आहे.झालेली घटना आणि ट्रॅक्टर कुठून कसे गेले हे सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाईल मध्ये चित्रीत झाल्याचे सुद्धा त्या परिसरात बोलले जात आहे.
तसेच यावल तहसीलदार यांनी आज दि.17रोजी अवैध विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर डंपर पकडण्यासाठी यावल मंडळ अधिकारी व यावल तलाठी यांना वगळता बाहेर गावातील सर्कल, तलाठी यांचे संयुक्त पथक नियुक्त केले होते का ? आणि असे असेल तर वाळूने भरलेले ते 2 ट्रॅक्टर त्या तलाठ्यांनी कसे काय सोडून दिले? ते ट्रॅक्टर तहसील कार्यालयात किंवा पोलीस स्टेशनला जमा का केले नाहीत? किंवा वाळूने भरलेले ट्रॅक्टर चालक पळून गेले अशी नोंद यावल तहसील किंवा यावल पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर नंबर सहित केली आहे का?किंवा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून त्या 3 तला ठयावर राजकीय सामाजिक प्रभाव टाकण्यात आला का? वाळूची घटनां गुलदस्त्यात दडपून असल्याचे सुदर्शन चित्रमंदिर चौकासह संपूर्ण यावल शहरात सुरू झाली आहे याबाबत प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी यावल तहसीलदार महेश पवार यांच्यामार्फत या घटनेचा तपास चौकशी करून तात्काळ कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
याबाबत बाहेरगावच्या एका तलाठ्यास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी मी नव्हतो परंतु झालेल्या घटनेनेला दुजोरा देत वाळूने भरलेले ट्रॅक्टर नव्हते वाळू खाली करून परत जात असलेले ट्रॅक्टर होते त्यामुळे कायदेशीर कार्यवाही करता आली नाही.
टिप्पणी पोस्ट करा