अट्रावल येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न.107 रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी

.
यावल दि.15
यावल तालुक्यातील अट्रावल येथे काल सोमवार दि.14 रोजी आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या तर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले.
      या मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीरात अट्रावल गावातील १०७ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर यातील १५ शस्त्रक्रीयेस पात्र रूग्णांना जळगाव स्थित कांताई नेत्रालयात शस्त्रक्रीये करीता रवाना करण्यात आले .
       अट्रावल येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात रावेर,यावल तालुक्यातील डॉक्टरांचे संचलित आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे व मित्र परिवारतर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात १०७ रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली. व यातील १५ रूग्ण ज्यांना मोतीबिंदू आढळून आला अशा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले.आश्रय फाउंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे.या शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसार्डा यांनी मार्गदर्शन केले.व नेत्र चिकित्सक डॉ.वैभव शिंदे,सहायक पवन पाटील यांनी रूग्णांची नेत्र तपासणी केली या  शिबीराच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये पोलिस पाटील पवन चौधरी, युवराज देसर्डा,किरण महाजन, हेमराज खाचणे,भगवान चौधरी, डॉ.राहुल चौधरी,सागर लोहार, विशाल बारी यांच्यासह डॉ.कुंदनदादा फेगडे मित्र परिवारचे सदस्य उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात