पोदार इंटरनेशनल स्कूल मध्ये महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


यावल दि.3
तालुक्यातील अकलूज येथे यावल भुसावल रोडवर असलेल्या पोदार  इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी पोदार जम्बो किड्स व पोदार इंटरनेशनल स्कूलचा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 
        विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत विविध शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले शिक्षकांनी व विद्यार्थींनी वर्गात गांधींजींच्या जीवनशैलीवर व राहणीमानावर सुंदर देखावे बनविले होते.पालकांसाठी व विद्यार्थांसाठी आईस्क्रीमच्या काड्यांपासून चरखा बनविणे, कागदापासून लाल बहादूर शास्त्रींची टोपी बनविणे.तीन माकडचे चित्राला बोटांच्या ठसांच्या सह्याने रंगविणे, प्रश्नमंजुषा अश्या प्रकारचे विविध मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.पालक व गांधीजी,कस्तुरबाजी,लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या वेश भूशेतील विद्यार्थ्यांनी दांडी यात्रेच्या देखाव्यापर्यंत दांडी मार्च काढला. शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दोन्ही महापुरुषांचे पूजन केले. विद्यार्थांसाठी आयोजित केलेले विविध खेळ व देखावे हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा श्रृंगी यांनी मार्गदर्शन केले.
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य 
आनंद हिरालाल शाह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापक रामदास कुळकर्णी तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात