दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हलकडून प्रवाशांची होणारी लुटमार थांबवावी ! सुराज्य अभियानातर्फे प्रशांत जुवेकर यांची मागणी.



यावल दि.7
विविध सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर विशेष करून येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हल्स कडून जी भरमसाठ भाडेवाढ करून सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली जाते, ती थांबावी आणि अशाप्रकारे जनतेला लुटणाऱ्या ट्रॅव्हल्स वर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सुराज्य अभियानाच्या वतीने जळगाव जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शाम लोही याना देण्यात आले. यावेळी समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, दुर्गा प्रसाद पाटील आणि राहुल घुगे उपस्थित होते. 
या निवेदनाची दखल घेत श्री. लोही यांनी लगेच याविषयी प्रसिध्दी पत्रक काढले आणि एक दर पत्रक निश्चित दरपत्रक काढून ते सर्वत्र तिकीट काऊंटर च्या येथे दिसेल असे लावण्यास सांगितले आहे. तसेच ज्यांचे दर अधिक आहेत त्यांना लगेच नोटीस पाठवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे लोही यांनी सांगितले. त्यांनी पुढील संपर्क पत्त्यावर तक्रार करण्यास सांगितले आहे.
मेल पत्ता - dyrto.19-mh@gov.in
संपर्क क्रमांक - 0257 - 2261819 असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शिवराज्य अभियान प्रमुख प्रशांत जुवेकर यांनी नमूद केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात