यावल येथील जे.टी.महाजन सहकारी सुत गिरणी जळगाव जिल्हा बँकेने विकी केलेली असुन मा.डॉ.शैलेंद्र खाचणे यांच्या हस्ते विजया दशमी निमित्ताने सपत्नीक सुत गिरणी साईटवर येऊन विधीवत पुजन केले व गिरणी कामगारांशी संवाद साधताना सूतगिरणी आपण लवकरच सुरू करू असे सांगितले यावेळी गिरणी कामगारांनी त्याचा सर्व कामगारांच्या वतिने सपत्नीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ललित बोंडे व डॉ.शैलेश खाचणे यांची फँमेलीसह सूत गिरणी साईटची पाहणी केली तेव्हा कामगारांनी सांगितले की तुम्ही गिरणी लवकरात लवकर सुरू करा तुम्हाला कामगारांचे पुर्णपणे सहकार्य राहील असे आश्वासन कामगांरातफै देण्यात आले त्यावर डॉ.शैलेंद्र खाचणे यांनी सांगितले की गिरणी ताब्यात मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आपल्या सूतगिरणीच्या भोंगा लवकरच वाजेल.यावेळी उपस्थित कामगार सुनिल वारुळे,उध्दव फेगडे,संजय फिरके,किशोर पाटील,राजेंद्र खाचणे,पंकज फिरके,शिवदास देशमुख,दिनकर ढाके,प्रविण कोल्हे,केशव पाटील,निलेश घोडके,राजु तायडे यांच्यासह अनेक सूतगिरणी कामगार उपस्थित होते.सुत गिरणी लवकरच सुरू होणार असल्याने सूत कामगारां मध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा