येथील श्री शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे विजयादशमीच्या दिवशी होणारा रावण दहनाचा कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला . यावल येथील प्रसिद्ध श्री महर्षी व्यास महाराज यांच्या मंदीरा समोरील हरिता,सरीता नदीच्या पात्रात आज दसरा विजयादशमीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील हे होते. तर रावण दहन रावेर यावल विधान सभाक्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले,या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन दर्जी फाउंडेशनचे संचालक गोपाळ दर्जी,जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे,फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम.बी. तडवी,यावल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, मनसेचे जनहित जिल्हा संघटक चेतन अढळकर,पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,प्रहारचे तुकाराम बारी,माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी,नाना बोदडे,नईम शेख यांच्यासह आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती,यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार शिरीष चौधरी यांनी सांगीतले की,दसरा विजयादशमीला आपण रावण दहन करतो तो म्हणजे असत्या वरती सत्याचा विजय, अंधारावरती प्रकाशाचा विजय आणी अन्याय वरती न्यायाचा विजय याचे प्रतिक म्हणुन आपण हा रावण दहनाचा कार्यक्रम करीत असतो यावेळी श्री महर्षी व्यासांच्या मंदीर क्षेत्राचे सोंर्दयीकरण व विकास होण्यासंदर्भात ज्या कल्पना या ठिकाणी उपस्थितांनी मांडल्यात त्याचा निश्चित आपण शासनाकडे पाठ पुरावा करू असे आमदार चौधरी यांनी आश्वासन दिले या प्रसंगी श्रीराम पाटील,प्रभाकर सोनवणे,गोपाळ दर्जी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बाविस्कर सर यांनी मानले.शेकडो नागरीकांच्या उपस्थित संपन्न झालेल्या या रावण दहनाच्या संपुर्ण कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,उपाध्यक्ष हेमंत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल दुसाने, प्रभाकर वाणी, अॅड .देवकांत पाटील,अरूण लोखंडे,बापु जासुद,कामराज घारू आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा