चला नदीला जाणूया उपक्रमात यावल तालुक्यातून तेजस पाटील यांचा सहभाग...




यावल दि.5, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि जलबिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आलेल्या "चला नदीला जाणूया" या 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा वर्धा येथील सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमात 1,2 व 3 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती.यामध्ये महाराष्ट्रातून विविध वैचारिक, पर्यावरणवादी, पाणी नदी वने यावर काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली होती. यात जळगाव जिल्ह्यातून यावल तालुक्यातील शिरसाड गावाचे युवा ग्रामपंचायत सदस्य तथा यावल शेतकी खरेदी विक्री संघांचे संचालक तेजस धनंजय पाटील यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. या 3 दिवसात नद्यांच्या आरोग्याचा प्रश्न, नदी पुनर्जीवन, परिक्रमा, नदी विकास आराखडा अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशात नमूद बाबींचे कठोर पालन झाल्यास राज्यातील नद्या अमृतवाहिन्या होतील असे विचार  आंतरराष्ट्रीय जलतज्ञ व मॅगसेस पुरस्कार प्राप्त माननीय डॉ. राजेंद्र सिंह जी यांनी या कार्यशाळे दरम्यान मांडले. 

यावेळी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल जी कर्डिले साहेब, ज्येष्ठ विचारवंत विनोद बोधनकर, जलबिरदारी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नरेंद्र चुग सर, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे अधिकारी श्रीनिवास पाचगावे सर, यशादा माजी अधिकारी सुमंत पांडे यासोबत अनेक मान्यवरांनी विचार मांडले. या सर्व उपक्रमाचे उद्घाटन वर्धा येथे 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांच्याहस्ते झाले. "चला नदीला जाणुया" या उपक्रमाची सुरुवात करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य संपूर्ण देशात ठरले आहे. तेजस पाटील व अन्य सहभागी सदस्यांना यावेळी आपल्या देशाचा तिरंगा ध्वज व कलश देण्यात आला. या अभूतपूर्व अशा सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला सर्वांना मिळाले. या कार्यातून पुढील काळात नक्कीच महाराष्ट्रात पाण्याचे नदीवरील काम उभे राहणार आहे. त्यासाठी 75 नदी यात्रेचे आयोजन महाराष्ट्र शासन आणि जलबिरादरी यांच्या मार्फत होणार आहे असे तेजस पाटील यांनी यावेळी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात