जागेची मोजणी न करता पूररेषेचे उल्लंघन करून नदीपात्रात बेकायदा संरक्षक भिंत. पुररेषा तीन अधिकाऱ्यांचे सी.आर.खराब होणार. मुख्याधिकारी यांचे विकासकाला पत्र.


यावल दि.5
यावल नगरपरिषद हद्दीत बऱ्हाणपूर अंकलेश्वर ( चोपडा यावल रस्त्याला लागून यावल कडून चोपड्याकडे जाताना यावल येथे दोन नंबरच्या पुलाजवळ ) महामार्गाला लागून असलेल्या आणि यावल शहरात प्रवेश करतानाच्या दर्शनी भागा जवळ तसेच हडकाई नदीपात्राला लागून असलेल्या शेतीचे बिनशेती प्रकरण करताना विकासकाने जागेची मोजणी न करता तसेच पूररेषेचे उल्लंघन करून नदीपात्रात बेकायदा संरक्षक भिंत बांधून टाकल्याने यावल शहरात मोठी खळबळ उडाली असून पूररेषेच्या या प्रकरणामुळे यावल येथील 2 आणि जळगाव येथील एका अधिकाऱ्याचे सर्विस बुक (सी.आर.) खराब होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

           दि.4ऑक्टोंबर 2022 रोजी यावल मुख्याधिकारी यांनी शेत गट नंबर 1766 या मिळकत मालकास म्हणजे विकासकाला दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की,नगरपरिषद हद्दीत गट नंबर1766आपल्या मालकीच्या जागेवर आपण नगररचना विभाग जळगाव यांनी अभिन्यासासाठी दिलेल्या शिफारशीनुसार संरक्षक भिंत बांधली आहे,त्याकरिता संरक्षक भिंत बांधणे करीता नाहरकत दाखला देण्यात आला आहे.परंतु लघु पाटबंधारे विभाग जळगाव यांनी आपले जमीनी लगत असलेल्या नदीचे पूररेषा पातळीचे सर्वेक्षण अद्याप झालेले नसल्यामुळे पूररेषा निश्चित झालेली नाही व त्यामुळे पूररेषा व संरक्षक भिंत बांधण्याचा नाहरकत दाखला पाटबंधारे विभागामार्फत देता येणार नसल्याची पत्राद्वारे कळविले आहे.तरी नगर रचना विभाग जळगाव यांचे अटीनुसार आपण पाटबंधारे विभागाचा नाहरकत दाखला प्राप्त न करता संरक्षक भिंतीचे काम केल्याचे आढळून येत आहे.
     तसेच गट नंबर 1766 या जागेवर मोजणीच्या खुणा आढळून येत नसल्यामुळे आपण स्वखर्चाने गट नंबर 1766 या जागेची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून तात्काळ करून घ्यावी मोजणीच्या खुणा प्रत्यक्ष जमिनीवर दर्शविण्यात याव्यात तसेच मोजणीच्या वेळी या कार्यालयास म्हणजे यावल नगरपालिकेला अवगत करण्यात यावे,मोजणी होईल तो पर्यंत सदर जागेमध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामे करू नये याची नोंद घ्यावी असे दिलेल्या पत्रात यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज   म्हसे यांनी नमूद केले आहे.
        यावल तहसीलदार व यावल नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल, पाटबंधारे विभाग शाखा यावल, यांच्या कार्यालया पासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर हडकाई नदीपात्रात संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या नाकावर टिचून बिनधास्तपणे हडकाई नदी पुलाजवळ प्रचंड रहदारी असलेल्या ठिकाणी आणि नदीपात्रात संरक्षक भिंतीचे बांधकाम संबंधित विकासकाने कोणाच्या आशीर्वादाने करून टाकले आणि या बांधकामाबाबत यावल तहसीलदार यावल नगरपालिका यांच्याकडे बांधकाम सुरू झाल्याबरोबर लेखी तक्रार केलेली असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंतीचे बांधकाम बंद करणेबाबत किंवा बेकायदा बांधकाम काढून टाकण्याबाबत कारवाई न केल्याने तसेच पुरेरेषेचे उल्लंघन केल्याने संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला असून या प्रकरणात यावल येथील दोन आणि जळगाव येथील एका अधिकाऱ्याच्या सर्विस बुकात या कामाबाबत दुर्लक्ष,दिरंगाई, कर्तव्यात दप्तरी बनावट दस्तऐवज केल्याची नोंद केली जाणार असून पुढील कार्यवाही होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात