यावल पोलीस स्टेशन समोर 50 ते 100 मीटर अंतरावर आणि दत्त मंदिर,स्टेट बँक,शनी मंदिर आणि सातोद रोडवर प्रचंड पसरलेल्या दुर्गंधीमुळे समस्त सर्व स्तरातील नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत ही दुर्गंधी कशामुळे येत आहे याची चौकशी यावल पोलीस,यावल नगरपरिषदेने तात्काळ करून मोठ्या प्रमाणात येत असलेली दुर्गंधी कशामुळे येत आहे,या परिसरात तिथे कुठे मेलेल गुरु ढ़ोर आहे की इतर काही सडलेल्या वस्तू पडलेल्या आहेत,नागरिकांना सहन न करता येणारी दुर्गंधी कशामुळे येत आहे याची चौकशी आणि खात्री करून यावल नगरपरिषद आणि पोलिसांनी तात्काळ संयुक्त कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरासह सातोद,कोळवद वड्री,परसाडे परिसरातील समस्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये बोलले जात आहे. ही प्रचंड दुर्गंधी आज दुपारपासून येत असल्याने याकडे संबंधित सर्व विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल शहरातून केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा