आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते यावल येथील बालसंस्कार बालवाडीच्या मुख्याध्यापिका शरायू सुधाकर वाणी उर्फ अंजली भानुदास कवडीवाले यांना जळगाव येथे एका आयोजित भरगच्च कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला.
रविवार दि.18 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आवारातील अल्पबचत भवनातील आयोजित भरगच्च कार्यक्रमात जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे यावल येथील बाल संस्कार बालवाडीच्या मुख्याध्यापिका शरायू सुधाकर वाणी उर्फ अंजली भानुदास कवडीवाले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेता राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते व राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदिपाताई वाघ तसेच पाटील मॅडम यांच्यासह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.सौ.अंजली कवडी वाले यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याने उपस्थित मान्यवरांनी तसेच बाल संस्कार विद्यालयाचे संस्थाचालक, संचालक यांच्यासह विद्यालयातील व शिक्षण क्षेत्रातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सन्मान व सत्कार करून अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा