तालुक्यातील साकळी येथील मंडळ अधिकाऱ्यास वाळू तस्कराकडून शिवीगाळ,धक्का बुक्की करून शासकीय कामात अडथळा आणून अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पळून नेल्याच्या कारणावरून अवैध वाळूची वाहतूक तस्करी करणाऱ्या चालकाविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे या प्रकरणात आणि यावल तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर वाहन क्र.नसल्याने आरटीओसह यावल पोलिसांच्या वाहन तपासणीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील साकळी येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी गुरुवार दि.13 रोजी रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास साकळी येथील कोतवाल विशाल उज्जैनसिंग राजपूत, गणेश लक्ष्मण महाजन यांना सोबत घेऊन गौण खनिज उत्खन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी व वाळूची अवैध वाहतूक करणारे वाहने यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथकासह डांभुर्णी येथे बस स्टँड जवळ उभे असताना जळगाव कडून एक डंपर येताना दिसला सदर डंपरची केबिन पांढऱ्या रंगाची,ट्रॉली आकाशी रंगाची असलेले सदरचे डंपर हे डांभुर्णी गावाचे दिशेने येताना दिसले सदरचे वाहन थांबविण्याचा इशारा केला असता सदर डंपर थांबल्यावर मागील बाजूस डंपरवर फक्त हॉर्न ओके प्लीज असे इंग्रजीत लिहिलेले दिसले तसेच डंपरवर वाहन क्र.नंबर कोणताही उल्लेख नव्हता डंपर चालकास मंडळ अधिकारी व सोबत पथक असल्याची ओळख दिली असता चालकाने त्याचे नाव विकी नेहेते रा.डांभुर्णी ता.यावल असे सांगितले,डंपरची पाहणी तपासणी केली असता डंपर मध्ये सुमारे अडीच ब्रास गौण खनिज वाळू दिसून आली सदर वाहन चालकास वाळू वाहतीकीचा पास/परवान्या बाबत विचारपूस करता त्यांनी काही एक माहिती सांगितली नाही तसेच सदर विचारपूस सुरू असताना सदर चालकाने सांगितले की तुम्हाला डंपर पकडण्याचा काही एक अधिकार नाही,तुम्ही डंपर का पकडले असे बोलून तो माझे सोबत हुज्जत घालून मला शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली,व त्याने मला जोरात धक्का मारून मागे ढकलून दिले व मी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.सदरचा वाद माझे सोबतचे स्टॉपने सोडविला त्यानंतर सदर विकी नेहेते याने वाळूने भरलेले डंपर डांभुर्णी गावचे पूर्व बाजूला असणाऱ्या नाल्याचे दिशेने पळवून घेऊन जात असताना आम्ही आमचे जवळील चार चाकी वाहनाने सदर डंपरचा पाठलाग केला असता विकी नेहेते यांनी त्याचे ताब्यात डंपरचे हायड्रोलिक वर करून त्यातील वाळू रस्त्यावर खाली करत करत वाहन जोरात चालवीत नेऊन पळून गेला,आम्ही त्याचा पाठलाग केला परंतु तो थांबला नाही.तसेच तो डांभुर्णी गावचा असल्याने घटना घडल्यापासून आता पावतो गावात त्याचा तपास केला परंतु तो मिळून न आल्याने आम्ही आमचे वरिष्ठा सोबत चर्चा करून आज रोजी यावल पोलीस स्टेशनला तक्रार दिली.या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास आहे.
यावल तालुक्यात संपूर्ण महसूल कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर,ट्रॅक्टर ट्रॉली यापैकी अनेक वाहन मालक व चालकांनीआपापल्या वाहनांवर वाहन क्र.टाकलेले नाही ही वाहने तालुक्यात प्रमुख व ग्रामीण रस्त्यावरून बिनधास्तपणे रात्रंदिवस वाहतूक करीत आहेत याकडे वाहतूक पोलिसांसह आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध वाळू वाहतूक प्रकरण संदर्भात यावल तहसीलदार यांची संशयास्पद भूमिका असल्याने फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांवर कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा