निविदा मॅनेज करून भ्रष्टाचार केल्याबद्दल फौजदारी स्वरूपाची कार्यवाही सुरु. फैजपूर नगरपालिकेचा प्रताप. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सहाय्यक आयुक्तांस लेखी पत्र.



यावल दि.14
 तालुक्यातील फैजपुर नगरपालिकेने निविदा मॅनेज करून भ्रष्टाचार केल्याबद्दल जिल्हाधिकारी जळगाव तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष यांनी सहाय्यक आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना लेखी आदेश पत्र देऊन फौजदारी स्वरूपाची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असे कळविल्याने नगरपालिका व ठेकेदारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
       जिल्हाधिकारी जळगाव यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी सहाय्यक आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना दिलेल्या आदेश वजा पत्रात नमूद केले आहे की, फैजपूर न.पा.ने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत धाडी नदी सुशोभीकरण करणे कामे संख्या -4 या कामांच्या निविदा मॅनेज करून भ्रष्टाचार केल्याबद्दल तसेच काँग्रेसचे ग्रामीण अधिवेशन 1936 चे संकल्पचित्र बांधकाम व उभारणी निविदा कामे संख्या 2 मधे अपहार व निविदा मॅनेज असले बाबत फैजपूर येथील ललित कुमार चौधरी यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकड़े तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने फैजपूर भाग फैजपूर उपविभागीय अधिकारी यांची समिती व जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयातील नगरपालिका शाखा सहाय्यक आयुक्त यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर निविदा मॅनेज झाल्याबाबत चौकशीत सकृतदर्शनी दिसून आले आहे त्या अनुषंगाने संबंधित जबाबदार कर्मचारी यांचे विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असे नमूद केले आहे.यामुळे आता सहाय्यक आयुक्त नगरपालिका शाखा जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव हे फैजपूर नगरपालिकेतील तत्कालीन संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची काय कार्यवाही करणार किंवा नाही?याकडे संपूर्ण यावल तालुका सह नगरपालिका व ठेकेदारी वर्तुळासह नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

        याबाबत सविस्तर माहिती अशी की फैजपूर येथील वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत धाडी नदी सुशोभीकरण विविध बांधकामे भाग 1ते 4 एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम 2 कोटी 18 लाख रकमेच्या एकूण चार निविदा सन 2017/18 मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या व काँग्रेस ग्रामीण अधिवेशन 1936 बांधकाम व उभारणी अंदाजीत रक्कम 73 लाख या निविदा सन 2015/16 दरम्यान प्रसिद्ध झाल्या होत्या.
        या निविदा तत्कालीन मुख्याधिकारी सुवर्णा उगले, फैजपूर नगरपरिषद कनिष्ठ अभियंता डिगंबर वाघ यांनी फैजपूर येथील ठेकेदार संजय सुधाकर वाणी यांच्याशी संगनमताने मॅनेज करून संजय वाणी यांना 9  ते 10 टक्के जादा दराने मिळवून दिल्याची तक्रार त्यावेळेस ललितकुमार नामदेव चौधरी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.18.8.2018 रोजी केली होती.त्याचप्रमाणे काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन 1936 चे संकल्पचित्र बांधकाम व उभारणी कामाची तक्रार दि.5.12.2018 रोजी केली होती.
      तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी जळगाव यांनी फैजपूर उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती,तसेच दक्षता व गुण नियंत्रण मंडळ नाशिक यांच्याकडे सुद्धा चौकशीची शिफारस करण्यात आली होती,सदर चौकशी समितीचा अहवाल मान्य होऊन मंत्रालयातील नगर विकास विभाग प्रधान सचिव यांच्याकडे शिस्तभंग कार्यवाहीचे प्रस्ताव दि.1मार्च2021रोजी लेखी पत्राने दिलेले आहेत.
      वरील तक्रारीसह अपहारीत रकमेच्या निश्चिती व जबाबदार अधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी ललित चौधरी यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे खटला दाखल केलेला आहे.
       तसेच कामांचा निकृष्ट दर्जा व अपहार बाबत तक्रारीच्या सविस्तर चौकशी कामी औरंगाबाद खंडपीठाने चौकशीसाठी कार्यवाही सुरू केल्याने काही दिवसात चौकशी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद खंडपीठात दिलेले असल्याचे समजले.
       तक्रारीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ जळगाव यांनी सदोष तांत्रिक मान्यता दिलेली असल्याने संबंधितांविरोधात फौजदारी कार्यवाहीची मागणी करणार असल्याचे सुद्धा ललित चौधरी यांनी माहिती दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात