जळगाव येथील वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील यावल पूर्व वनक्षेत्रातून तीन आरोपी पळुन गेल्याने तसेच गेल्या आठ दिवसात आरोपीचा शोध न लागल्याने ज्या वनक्षेत्रपालाच्या ताब्यातून आरोपी पळून गेले त्या वनक्षेत्रपालावर निलंबनाची कारवाई होऊ नये म्हणून दहा पेट्या धुळे,नागपूर वरिष्ठ वन विभाग कार्यालयाकडे गेल्याने यावल पूर्व पश्चिम वन विभाग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह वनप्रेमी संघटनांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
यावल वन विभागातील यावल पूर्व वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेले तीन आरोपी दि. 12 ऑक्टोंबर 2022 रोजी वनशेत्रपालाच्या ताब्यातून पळून गेल्याने गेल्याने तसेच 8 दिवसात आरोपी शोधण्यात संपूर्ण वन विभागाला अपयश आले आहे. आरोपींचा शोध लागत नसल्याने यावल वनविभाग आणि पोलीस अधिकाऱ्यावरच संशय व्यक्त केला जात असून वन विभागातील वाघझिरा वनपाल, निंबादेवी वनरक्षक,वाघझिरा येथील तपासणी नाक्यावरील वन मजूर यांना पूर्ण चौकशी न करता 18 ऑगस्ट 2022 रोजी तात्काळ निलंबित केले होते आणि आहे. परंतु ज्या अधिकाऱ्यांच्या ताब्यातून 3 आरोपी पळून गेले. त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी वन विभागातील वरिष्ठ अधिकारी संगनमताने विलंब करीत असल्याचा तसेच अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होऊ नये म्हणून यावल वन क्षेत्रपाल यांच्या कार्यक्षेत्रापासून तर जळगाव येथील यावल वन विभाग सहाय्यक उपवनसंरक्षक धुळे येथील धुळे वनवृत्त विभागाचे वनसंरक्षक नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक आणि वने व महसूल विभाग प्रधान सचिव यांच्या कार्यालयापर्यंत गेल्या आठ दिवसात दहा पेट्यांचा व्यवहार झाल्याने आणि ज्या अधिकाऱ्याच्या ताब्यातून 3 आरोपी फरार झाले त्या अधिकाऱ्यावर जाणून-बुजून निलंबनाची कारवाई होत नसल्याने संपूर्ण यावल वन विभागातील वनपाल वनरक्षक वनमजूर यांच्यासह इतर वन कर्मचाऱ्यांसह वनप्रेमी संघटना मध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यावल विभागातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तात्काळ होते तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हातातून तीन आरोपी पळून गेले त्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यासाठी धुळे वनवृत्त विभाग आणि नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक जाणून बुजून विलंब का करीत आहे? असा प्रश्न संपूर्ण यावल वन विभागातील वन कर्मचाऱ्यामधे उपस्थित केला जात असून.तीन आरोपी पळून गेलेल्या प्रकरणात वरिष्ठ जाणून बुजून आपल्या कर्तव्यात दिरंगाई आणि विलंब करीत असल्याने त्यांच्यावर सुद्धा पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संपूर्ण जळगाव वन विभागात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा