दि.3 रोजी वनोली येथील साईबाबा मंदिरात अष्टमी निमित्त 566 वा महोत्सव.दोन मंत्री खासदार पाच आमदार यांच्यासह लाखो भाविक उपस्थित राहणार...

यावल दि.2 
तालुक्यातील वनोली तालुका यावल येथील श्री साईबाबा मंदिराच्या 566 वा महोत्सव यांसह पूजा विधी करण्यात येणार असून अष्टमीला होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम दि. 3 ऑक्टोबर 22 रोजी सोमवारी करण्यात आला असून यावेळी राज्याचे दोन मंत्री व एक खासदार पाच आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती वनोली साईबाबा मंदिर ट्रस्ट अध्यक्ष तथा यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांनी माहिती दिली आहे 

यावल तालुक्यातील वनोली हे गाव बामनोद व पाडळसा पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे या गावी श्री साईबाबा महाराजांनी वास्तव्य केलेलं होतं त्याकाळी दुष्काळ पडला तेव्हा कोणाकडेही खायला अन्नधान्य गोळे तेल  नव्हते चक्क महाराजांनी पाण्यावरती इथे नंदादीप सुरू ठेवला होता घटस्थापनेच्या दिवशी अश्विन महिन्यात याठिकाणी घटाची पूजा केली जाते घटस्थापना होते

 तसेच आठ ते नऊ दिवस या ठिकाणी विविध पूजा विधी होत असतात त्यात विधिवत पूजा झाल्यानंतर नवग्रह पूजा होम पूजन ग्रामदेवता पूजन व धार्मिक कार्यक्रम होऊन अष्टमीच्या दिवशी कुवार का बसून त्याचे पूजन करुण महाप्रसाद तीस ते चाळीस हजार लोकांसाठी करण्यात येत असतो या महाप्रसादाचा मध्ये खीर चक्री म्हणजे पोळ्या गंगा फळाची भाजी व उडदाच्या डाळीचे वडे सर्वांना पुरतील एवढे पोटभरून मंदिर विश्वस्त समितीकडून दिले जातात आणि नवमी व दसऱ्याला   सव्वाशे फूट देव काठी मोर नदीवर नेऊन वाजत-गाजत तिला रंगीत  वस्त्र परिधान करून  धुऊन आणली जाते  व संध्याकाळी  गावामध्ये  बारा गाड्या व  तमाशा यांचा कार्यक्रम ही लोकनाट्य  करमणुकीसाठी ठेवले जातात 

 या छोट्याश्या गावी सर्व नातेवाईक  ज्या त्या ठिकाणी येऊन  वर्दळ असते प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसे तर्फे दरवर्षी या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवली जाते तर फैजपूर पोलिसांकडून सुरक्षेचे सर्व बंदोबस्ताची जबाबदारी असते याठिकाणी तहसीलदार प्रांताधिकारी व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी सुद्धा या दिवशी भेट देतात विशेष म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राज्यातून भाविक याठिकाणी भेट देतात व आपली मानता ही पूर्ण करीत असतात कोणी गोडेतेल  तर नारळ वाहिलं जातं याठिकाणी दोन नंदादीप सतत 5 66 वर्षापासून जळत असून कधीही याठिकाणी तेल कुठले नाही स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावडे खासदार रक्षाताई खडसे जिप सदस्य पंचायत समिती सदस्य व इतर नेत्यांकडून मोठा निधी या ठिकाणी मिळवण्यासाठी हातभार लागलेला आहे गेल्या वर्षी covid-19 च्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टंसिंग पाडून व रोगही उद्भवू नये म्हणून शासनाने दिलेल्या नियमानुसार घटस्थापना करण्यात आली होती यावर्षी कोविडची सर्व नियम शिथिल झाल्यामुळे अष्टमीच्या महापूजा व भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात होणार असून या कार्यक्रमा प्रसंगी स्वर्गीय हरिभाऊ जावडे यांच्या हस्ते विकास कामांची जी पूजन झाले होते त्याचे लोकार्पण राज्याची कॅबिनेट मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन जिल्ह्याची पालकमंत्री तथा राज्याची पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील खासदार रक्षाताई खडसे भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे भुसावळचे आमदार संजय सावका रे मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील चोपडा यावल विधानसभेचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार शिरीष दादा चौधरी अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह सर्वपक्षीय  कार्यकर्ते व जळगाव जिल्हाभरातील साई भक्त परिवार उपस्थित राहणार आहेत असे आवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्ट वनोली तालुका यावल अध्यक्ष हिरालाल व्‍यंकट चौधरी व साईबाबा ट्रस्टीचे संचालक मंडळ तसेच ग्रामस्थ तसेच सहकाऱ्यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात