लंपीग्रस्त गुरांसाठी शासकीय विमा योजना राबविण्याची मागणी. डॉ.कुंदन फेगडे यांनी दिले डॉ.विखे पाटील यांना निवेदन.

यावल दि.8
ग्रामीण भागात गुरांवर होणाऱ्या लंपी स्किन डिसीज आजारा मुळे ज्या शेतकऱ्यांचे,पशुधनाचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत आणि गुरांसाठी शासकीय विमा योजना राबविण्याबाबत महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉ.कुंदन फेगडे यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
       जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या दोन,तीन महिन्यापासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनच्या गुरांवर लंपी स्किन डिसिज या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.हा आजार अतिशय जलद गतीने पसरत आहे.या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन, तीन महिन्याभरात जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गुरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात काही गुर दगावले सुद्धा आहेत.या संपूर्ण झालेल्या नुकसानाची चिंता हि पशुधन पालकांना व शेतकऱ्यांना भेडसावत असून यासाठी शासनातर्फे तात्काळ उपाय योजना करून आर्थिक मदत मिळावी तसेच  गुरांसाठी शासकीय विमा योजना तयार करून राबविण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात