पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचा 150 रुग्णांनी घेतला लाभ.

यावल दि.18
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा यावल तालुकाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात झाली.
       काल दि.१७ सप्टेंबर २०२२ वार शनिवार रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन डॉ.कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भुसावळ रोड यावल येथे केले होते.या शिबिराचे उदघाटन हिरालाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावल येथे डॉ.पवन सुशील,व डॉ.प्रवीण पाटील यांनी मोफत रुग्ण तपासणी करून ओषधपोचारा बाबत मार्गदर्शन केले.या शिबिरामध्ये एकूण १५० गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
         या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, भाजपा किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सौ. सविताताई भालेराव,भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी,आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, ओ.बी.सी.सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे,कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष विजय मोरे यावल शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी,सौ.सरलाताई कवडीवाले सरचिटणीस परिष नाईक,मनोज बारी आदींची उपस्थिती होती या शिबिरास भारतीय जनता पार्टी यावल तालुका,सागर लोहार, दिपक फेगडे,विशाल बारी, जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात