दोन महत्वाच्या राज्यांना जोडणाऱ्या बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्यमार्गा वरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन,रस्त्यात खड्डा की खुडयात रस्ता अशी अवस्था ही खड्डेमय झाली असल्याने या मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे वारंवार वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत असुन अनेक वाहनधारकांनी अशा प्रकारे झालेल्या अपघातात आपला जिव देखील गमावला असुन,या मार्गावरील रस्त्यावरील यावल ते किनगाव हे रस्ते आठ दिवसात दुरुस्त न झाल्यास आपण यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा संबंधीत विभागास दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रविन्द्र सुर्यभान पाटील यांनी दिला आहे .
या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात रविन्द्र सुर्यभान पाटील यांनी म्हटले आहे की,उत्तर प्रदेश, हरियाणा,गुजरात,आग्रा,आणी मध्य प्रदेश अशा महत्वाच्या राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर या राज्य मार्गावरील यावल ते किनगाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे .
यावल ते किनगाव (बऱ्हाणपूर अंकलेश्वर राज्य मार्गावर ) खूप मोठ मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत, या रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमावला आहे. तरी आठ दिवसामध्ये रस्ता दुरुस्ती न केल्यास आपल्या यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार आहे. तरी आपल्या स्तरावरून नोंद घेण्यात यावी.असे निवेदनात म्हटले आहे .
टिप्पणी पोस्ट करा