यावल दि.10
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"अंतर्गत "स्वराज्य महोत्सव" यावल नगरपरिषदेकडून नियोजन पूर्वक साजरा केला जात असल्याची माहिती मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नियोजन पूर्वक मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी यावल नगरपरिषदे मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, त्यामध्ये महिला बचत गट,शिक्षक,व्यापारी संघटना, पत्रकार यांचे सोबत सभा घेऊन घर घर तिरंगा बाबत जनजागृती करण्यात येत आहे.विद्यार्थीनी व विद्यार्थ्यां मार्फत रॅली,हेरीटेज वॉक काढण्यात आले.शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.यावल नगरपरिषद आवारात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भव्य असा 75 फुट उंचीचा तिरंगा उभारणीचे काम सुरु आहे.तसेच नागरिकांना "घर घर तिरंगा"अंतर्गत तिरंगा उपलब्ध करणेसाठी यावल नगरपरिषद कार्यालयात(वसुली विभागात)तिरंगा विक्रीस उपलब्ध आहे.तरी यावल शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर दि.13/8/2022 ते 15/8/202 या कालावधीत तिरंगा फडकावा असे आवाहन वजा विनंती यावल शहरातील नागरिकांना यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा