आपल्या मनातील आणि आपल्याला हवी असलेली कोणतीही माहिती,निवेदन बातमीच्या माध्यमातून नि:पक्ष पणे निर्भीडपणे जनहित व समाज हितासाठी प्रसिद्ध करावयाची असल्यास...
संबंधित लोकप्रतिनिधी पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी व सर्व स्तरातील जे काही निवेदन, माहिती बातमी प्रसिद्ध करण्यासाठी व्हाट्सअप वर टाकत असतात त्यांनी आपले निवेदन व माहिती व्हाट्सअपवर टाकल्यानंतर माझ्याशी(पत्रकार म्हणून)मोबाईल वरून संपर्क साधून माहिती किंवा निवेदन व्हाट्सअप वर टाकले आहे असे सांगितल्यावरच बातमी प्रसिद्ध केली जाईल अन्यथा कोणाचीही कोणतीही बातमी कितीही महत्वाची असली तरी प्रसिद्ध होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आणि आपण मोबाईल वरून संपर्क नाही जरी केला तरी जी घटना घडली आहे,किंवा कोणता कुठे कसा कार्यक्रम कशाप्रकारे झाला आहे किंवा होणार आहे त्याबाबत तुमच्या निवेदनाला प्राधान्य न देता जनहितासाठी वस्तुस्थितीला आणि जनमानसातून बोलक्या असलेल्या प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या जातील.
सुरेश जगन्नाथ पाटील.
संपादक-व्यासनगरी
ता.प्र.दैनिक साईमत.
8 ऑगस्ट 2022
टिप्पणी पोस्ट करा