तापी पाटबंधारे विकास महामंडळातील झालेल्या कामाची चौकशी करणे बाबत नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे यांनी कार्यकारी अभियंता तापी पाटबंधारे विभाग महामंडळ यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आणि कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
कार्यकारी अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे दि.19 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,14 मार्च 2000 पासून तापी पाटबंधारे विकास महामंडळात झालेल्या कामाची चौकशी करणे बाबत अर्ज दिले आहेत.
वेळोवेळी वर्षनिहाय आपण सूचीस मान्यता दिलेली आहे त्या पत्रामध्ये कामे पार पाडण्यासाठी शासन परिपत्रकाचा संदर्भ दिलेला आहे,शासन शुद्धिपत्रक क्रमांक देदू /2007/ (755/07) कामे दि.11/2/ 2008 मधील परिच्छेद दोन नुसार निविदा काढण्यात याव्या असे म्हटले आहे.
मोठे प्रकल्प सिंचन उपविभागातील देखभाल व दुरुस्तीच्या सर्व कामांसाठी एका आर्थिक वर्षासाठी एकच निविदा मध्यम प्रकल्प एका प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक निविदा लघु व साठवण तलाव अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत वर नमूद केलेल्या घटकांचे व घटक नियाह कामाचे तुकडे पाडणे ब्रेकप आवश्यक असल्यास त्याचे समर्थनार्थ लेखी कारण म्हणून तसे करण्याच्या आवश्यकतेबाबत मुख्य अभियंता यांनी स्वतः खातरजमा करून घेऊन अशी कामे करणाऱ्या मुख्य अभियंता यांना अधिकार राहतील असे निर्देश आहेत.वरील प्रमाणे प्रत्येक शासन परिपत्रक मार्गदर्शक सूचना लिखित असून प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांनी सन 2021सन 2022 या आर्थिक वर्षात कोणतेही निकष न पाळता मोठ्या प्रकल्पाचे एका विभागात एका तालुक्यात 10 ते 15 निविदा काढल्या आहेत,सुमारे 200 ते 250 निविदा काढल्या आहेत. त्यास मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांनी कोणत्या प्रकारे समर्थन दिले आहे हे समजू शकत नाही हतनूर धरणावर तर 41 वक्र दरवाजाचे 2/2गेटचे अंदाजपत्रक करून त्याचे सोयीनुसार 20 ते 30 निविदा काढल्या आहेत. कार्यकारी अभियंता यांचे स्पष्टीकरण आहे याचा माननीय मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांची त्यांचे अभिप्राय सह खुलासा सादर करावा.
खरा भ्रष्टाचार या स्तरावर झालेला आहे त्यात आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता आहे क्षेत्रीय स्तरावर कामे करून भ्रष्टाचार आतापर्यंत होतो मात्र असा वरिष्ठ पातळीवर झालेला भ्रष्टाचार दाबला जातो तरी याची तिसऱ्या यंत्रणे कडून चौकशी व्हावी अशी मागणी नितीन रंधे यांनी केली असून चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा दिलेला आहे निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी मुंबई येथील जलसंपदा विभाग सचिव,जलसंपदा विभाग ठाणे, नाशिक येथील अधीक्षक अभियंता व दक्षता पथक यांच्याकडे पाठविलेल्या आहेत. तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
टिप्पणी पोस्ट करा