जुने घर पाडणाऱ्या ८ मजुरांना त्या एका घराचे काम सुरू असताना अचानक लाखो रुपयांची सोन्याची नाणी सापडली.इतकं सोनं मिळणं एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे त्या मजुरांनी ती ६० लाख रुपयांची सोन्याची नाणी घरमालकाला न सांगता आपसात वाटून घेतली.परंतु त्यांचे हे कृत्य माहिती पडल्याने सोन्याची नाणी असलेल्या खजिन्यामुळेच मजुरांना मात्र तुरुंगात हवा खावी लागली.
आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील मध्य प्रदेशात धार येथील घटना आहे सोन्याचे नाणे सापडले की माहिती मिळताच पोलिसांनी कामगारांना अटक केली.
ही घटना धार जिल्ह्यात घडली आहे.१९आणि२१ऑगस्ट रोजी २,६०० चौरस फूट जागेतील एका जुन्या घरांचे बांधकाम फाडून नवीन घर बांधकामासाठी मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू असताना,कामावर असलेल्या मजुरांना सोन्याची नाणी असलेला मोठा खजिना असलेले धातूचे भांडे सापडले.त्यात एक किलो वजनाची ८६ सोन्याची नाणी होती.सोन्याची नाणी सापडल्यानंतर त्यांनी कोणालाही याबाबत माहिती न देता नाणी आपापसात वाटून घेतली.
परंतु ही गुप्तधनाची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण धार परिसरात पसरल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार म्हणाले की,एका मजुराने एक नाणे विकल्यानंतर आम्हाला या खजिन्याबाबत माहिती मिळाली. या मजुरांनी ही नाणी पुरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाची असूनही कोणतीही माहिती न देता आपापसात वाटून घेतली.जर ही पुरातत्त्व नाणी असतील तर त्यांची किंमत ६० लाखांवरून १ कोटीपर्यंत वाढेल,असे ते म्हणाले आहे.या घटनेमुळे धार परिसरात अनेक प्रश्न उपस्थित केले असून घर मालकापेक्षा मजुरांची भाग्य जोरात होते परंतु दैव देते आणि कर्म नेते असे म्हणण्याची वेळ आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा