यावल दि.2
शहरात महाजन गल्लीत श्री विठ्ठल मंदिरा जवळील नवभारत गणेश मित्र मंडळाची व सदस्यांची बैठक श्री गणेशोत्सव नियोजन पूर्वक साजरा करण्यासाठी दि.31 जुलै 2022 रोजी संपन्न झाली,या बैठकीत नवभारत गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी दीपक फेगडे,उपाध्यक्षपदी रितेश बारी तर खजिनदार म्हणून निर्मल चोपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात शांततेत,नियोजन पूर्वक साजरा करण्यासाठी शहरातील प्रगतशील शेतकरी तथा केळीचे व्यापारी प्रमोद शेठ नेमाडे,पराग बोरोले,डॉ.कुंदन फेगडे,उमेश फेगडे,राकेश कोलते,ओंकार राणे व इतर मान्यवरांच्या मार्गदर्शना खाली नवीन कार्यकारणीची सर्वानुमते निवड करण्यात आली,व श्रींचे आगमन सोहळ्या पासुन ते विसर्जन सोहळ्या पर्यंत होणारे कार्यक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली,बैठकीत सर्वानुमते मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे निवड केली.अध्यक्ष-दिपक फेगडे,उपाध्यक्ष-रितेश बारी,खजिनदार-निर्मल चोपडे,
सह खजिनदार-स्नेहल फिरके,सचिव-दिवाकर फेगडे,सदस्य-भुषण फेगडे,सदस्य-सोहन कोळंबे,सदस्य-किशोर महाजन,सदस्य-संजय फेगडे,सदस्य-दिपक पाटील,सदस्य-सागर इंगळे,सदस्य-कोमल इंगळे,सदस्य-हेमंत फेगडे,सदस्य-शेखर बाविस्कर,सदस्य-उज्वल कानडे या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली कार्यकारिणीने उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशोत्सव नियोजन पूर्वक, शांततेत साजरा करणार असल्याचे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा