पाडळसे ग्रामपंचायत तर्फे गावात सीसीटीव्ही कॅमेरे. ग्रामपंचायतचा कौतुकास्पद निर्णय. डी.वाय.एस.पी.डॉ.कुणाल सोनवणे यांच्या शुभहस्ते लोकार्पण.

यावल दि.29                                              पाडळसे ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून पाडळसे गावातील बस स्टँड परिसर आठवडे बाजार परिसर ग्रामपंचायती इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या कॅमेऱ्याचा लोकार्पण सोहळा काल दि.28 रोजी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतल्याने प्रशासनातर्फे व सर्व स्तरातून ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
       यावेळी बोलताना डॉ.कुणाल सोनवणे यांनी सांगितले गावामध्ये एकोपा आणि शांतता नांदल्यास गावात मोठा विकास होऊ शकतो आगामी काळातील गणेशोत्सव आणि इतर सण शांततेत साजरा करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केले  यावेळी फैजपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पाडळसे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच माधुरीताई पाटील, पोलीस पाटील सुरेश खैरनार, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, माजी प्रभारी सरपंच रजनीकांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य विष्णू भिल्ल,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश भोई,माजी तंटामुक्ती अध्यक्ष राज मोहम्मद पठाण,सामाजिक कार्यकर्ते सय्यद नूरअली,आरिफ पटेल,शुभम तायडे,सय्यद रज्जाक,सय्यद इसाक,महमूद पटेल,ग्राम सुरक्षा दलाचे उपाध्यक्ष मनोज तायडे,संग्राम ऑपरेटर सुलतान पटेल,क्लार्क ललित चौधरी,शिपाई लक्ष्मण बऱ्हाटे, आरोग्य कर्मचारी विजय रल, यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात