कठोरा रस्त्यावर शेतात एकाची निर्गुण हत्या. मयत मनोज भंगाळे यावल तालुक्यातील चितोडा येथील.

यावल दि.22
चितोडा तालुका यावल येथील मनोज संतोष भंगाळे वय अंदाजे 35 चे 40 या इसमाचा आज रात्री कठोरा रस्त्यावरील शेतात कोणीतरी अज्ञात इस्मानी निर्घृण  हत्या केल्याची घटना आज सोमवार दि. 22 रोजी सकाळी उघडकीस आल्याने चितोडा,डों.कठोरा,अट्रावल,सांगवी, शिवारासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली, घटनेचे वृत्त कळताच यावल पो.नि.राकेश माणगावकर,उपनिरीक्षक विनोद खांडबहाले,गणेश ढाकणे,रोहिल गणेश,संदीप सूर्यवंशी,किशोर परदेशी,सुशील घुगे इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
असून चौकशी व तपास जलद गतीने सुरू केला आहे,हत्या करणारे अज्ञात मारे करूचा तपास लवकरच लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले, मयत मनोज भंगाळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ असा परिवार आहे,मनोज हा सर्वसामान्य कुटुंबातील तसेच शेतमजुरी करणारा होता त्याचे कोणाशीही खास वैमनस्य नव्हते काल रात्री 20:30 वाजता जेवण केल्यानंतर तो घराबाहेर गेल्यानंतर घरी परत आला नाही. तो कोणासोबत गेला त्याला कोणी बोलावले होते? हे समजायला मार्ग नाही परंतु त्याच्या मोबाईल वरून तपास अंती समजेल असे त्यांच्या कुटुंबियांकडून समजले त्यांच्याजवळ टीव्हीएस लाल रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच-19-9558 ही होती कठोरा रस्त्यावर चंद्रकांत निंबाजी चौधरी यांच्या कपाशीच्या शेतात मनोज भंगाळे यास बोलावून त्या ठिकाणी त्याची निर्गुण हत्या केल्याचे दिसून येत आहे त्याच्या मानेवर आणि डोक्यावर तीष्ण हत्यारांनी वार केलेले आहे,गळा आवळण्यासाठी दोरी सुद्धा घटनास्थळी दिसून येत आहे.मोटरसायकल सुद्धा घटनास्थळी पडून आहे आज दिनांक 22 रोजी सकाळी मनोज याचा मृतदेह शेतात जाणाऱ्या मजुरांना दिसून आल्याने तसेच मनोज याची निर्गुण हत्या केली असल्याचे उघडकीस आल्याने चितोडा,डों. कठोरा,सांगवी,अट्रावल यावल परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली चितोडा ग्रामपंचायत माजी सरपंच तथा शिवसेनेचे पदाधिकारी कडू पाटीलआणि चितोडा येथील पोलीस पाटील यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने यावल पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले व पुढील चौकशी तपास सुरू केला घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात