यावल दि. 22
श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात पहिल्यांदा भव्य कावड यात्रेचे आयोजक श्री तारखेश्वर मंदिर संस्थानने केले होते.या कावड यात्रेची सुरुवात श्री.अर्जुनेश्वर महादेव मंदिर अंजाळे ते श्री तारकेश्वर महादेव मंदिर यावल येथे समाप्ती झाली. यावेळी डॉ.कुंदन फेगडे सहभागी होऊन यांच्या हस्ते श्री तारकेश्वर महादेव मंदिरात आरती करण्याचे भाग्य त्यांना लाभले.यावेळी ज्या भक्ताना यात्रेत पाई येतांना काही दुखापत झाली,किंवा ज्यांना शारीरिक त्रास होत होता अश्या भक्ताना आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी मोफत औषध वाटप केली.
तसेच श्री तारकेश्वर महादेव मंदिर यावल येथे डॉ.कुंदन फेगडे यांनी सामाजिक आर्थिक,वैद्यकीय सहकार्य केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा