भव्य कावड यात्रेतील भक्ताना आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत प्रा.आ.तपासणी व औषध वाटप.

यावल दि.16
रविवार दि.14ऑगस्ट रोजी रावेर तालुक्यातील भोकरी जवळ असलेले श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे श्री क्षेत्र सुलवाडी  ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर पर्यत भव्य कावड यात्रा काढली जाते.या यात्रेची रविवार सायंकाळी  समारोप करण्यात आला.यात्रेत भक्ताना येताना शरीराला काही दुखापत झाल्या किंवा ज्यांना शारीरिक त्रास होत होता अश्या भक्ताची आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी,व औषध वाटप केली.
      तसेच श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.या वेळी कावड यात्रेत पायदळ चालतआलेल्या भक्ताचे डॉ.कुंदन फेगडे यांनी मोफत रुग्णसेवा करून औषधी वाटप केल्याबद्दल त्यांचे कावड यात्रा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात