फैजपूर : दि.12
जळगांव जिल्ह्यात गुरांवर होत असलेल्या लंपी संसर्गजन्य आजाराची तीव्रता लक्षात घेता,तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी स्व.हरिभाऊ जावळे मित्रपरिवार ग्रुप च्या वतीने श्री.अमोल जावळे यांनी दि. 03/8/2022रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री व आमदार गिरीशभाऊ महाजन यांना निवेदन देऊन विनंती केली होती.त्याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक प्रशासन व तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत जिल्हाभरात गावोगावी लसीकरणाला गती मिळाली आहे.याबद्दल पशुपालकांसह स्वर्गीय हरिभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा