यावल दि.15,उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कैलास कडलग यांच्या हस्ते यावल नगरपालिकेत 75 फूट उंचीवर "तिरंगा ध्वज" फडकविण्यात आला.स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल नगरपरिषद सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध रीतीने प्रथमच 75 फूट उंचीवर तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी जयत तयारी केली होती आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले.मोठ्या उत्साहात शांततेत नियोजनबद्ध रित्या पार पडलेल्या समारंभ प्रसंगी यावल नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी,आजी-माजी सदस्य यांच्यासह माजी अध्यक्ष नौशाद तडवी यांच्यासह विद्यार्थी नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावल नगरपरिषदेच्या इतिहासातील काही माजी अध्यक्ष आणि माजी काही सदस्य उपस्थित नसल्याने तसेच नगरपरिषदेचे माजी सदस्य तथा माजी अध्यक्ष बाळासाहेब शिर्के यांची प्रकृती,तब्येत ठीक नसल्यावर सुद्धा ते उपस्थित राहील्याने उपस्थित न राहिलेल्या काही माजी अध्यक्ष,माजी सदस्यांबाबत समारंभातच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा