यावल दि.28
संपूर्ण यावल परिसरात एकच खळबळ उडविणाऱ्या येथील शहरातील काजीपुरा वस्तीतील घटनेत नाजीया खलील काजी ( वय ३५, रा. काजीपुरा) या महिलेच्या खून प्रकरणी, यावल पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी जावेद युनूस पटेल यास रविवारी येथील न्यायालयात हजार केले असता न्यायाधीश मनोज बनचरे यांनी 1 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
येथील काजीपुरा वस्तीतील ३५ वर्षीय महिलेच्या डोक्यात संशयित आरोपी जावेद युनूस पटेल याने शनिवारी सायंकाळी ७,३०वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून निर्गुण हत्या केली होती.फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांनी शनिवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे समवेत घटनास्थळी भेट दिली होती पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा