यावल दि.31
तालुका ग्रामसेवक संघटना व यावल पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक अशा दोन जणांचे सेवानिवृत्ती पर सत्कार सोहळा पार पडला . यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकिय ईमारतीच्या सभागृहात आपल्या सेवेचे कार्यकाळ पुर्ण केलेले आमोदा तालुका यावल येथे ग्राम पंचायतचे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी शरद एच नारखेडे व विरोदा येथे ग्रामसेवक म्हणुन कार्य सांभाळणारे नामदेव बाजीराव पाटील यांची आपल्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतुन दिनांक २९ जुलै रोजी निष्कलंक अशी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा अंत्यत भावानिक असा सेवानिवृत्तीचा सह पत्नीक निरोप संमारभ हा पंचायत समितीचे कार्यालयीन अधिकारी जी एम रिंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला , या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सचिव संजय भारंबे , यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, जिल्हा ग्रामसेवक पतपेटीचे व्हाइस चेअरमन बि के पारधी ग्रामसेवक संघटनेचे हितेन्द्र महाजन ,मजीत तडवी , के जी पाटील , राजु तडवी , महीला ग्रामसेवक रूपाली तळेले , योगीता हिवराळे , प्रियंका बाविस्कर, शुषमा कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सेवा निवृत्तीचा कोटुंबीक निरोप सोहळा पार पडला यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना संजय भारंबे , आर टी बाविस्कर , के जी पाटील आदींची या दोघ अधिकारी यांच्या उत्कृष्ठ प्रशासकीय सेवेचा कार्य उल्लेख केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव यांनी मानले .
टिप्पणी पोस्ट करा