यावल दि.31यावल नगरपालिका,यावल न्यायालय आणि अति प्राचीन तथा प्रसिद्ध असलेल्या राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यापासून पासून अर्धा किलोमीटर अंतरावर तसेच बाहेर पुरा भागातील राजपूत व इतर सर्वच समाजासह यावल शहरात 'ये' 'जा' करतात त्या नदीच्या पुलाजवळ खडकाई नदीपात्रातून यावल शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणी बारा गाड्यांसाठी अतिक्रमणाचा ब्रेक,स्पीड ब्रेकर निर्माण झाला असल्याने याकडे शासकीय, सामाजिक,राजकीय स्तरात स्वतःला सक्रिय समजणारे 98% टिलकचंद,आंधळे,आणि बहिरे असलेल्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने आणि संपूर्ण यावल शहराच्या अति प्राचीन ऐतिहासिक प्रथेला काळीमा फासणारे कृत्य होत असल्याने याबाबत संपूर्ण यावल शहरात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून शहरासह तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
श्रावण महिन्यात देवाचे देव 'महादेव' यांचा प्रभाव भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात असतो त्यात रविवार (दि.31जुलै 2022)हा दिवस महादेवाने अवतार घेतलेल्या श्री मल्हारी मार्तंडाचा दिवस प्रख्यात आहे. अशा या शुभ दिवशी शहरातील फक्त दोन पवित्र आत्म्यांना तथा नागरिकांना यावल येथील 'धाडी' नदीपात्रातील रस्त्यावरून बारा गाड्या ओढल्या जाता त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृत अतिक्रमण होत असल्याची समयसूचकता मिळाली आणि त्याने ही माहिती आणि वस्तुस्थिती लोकांना आणि शासनाला समजण्यासाठी सांगितली.
नदीपात्राच्या किनाऱ्या लगत आणि सार्वजनिक वापराच्या रस्त्याला लागून त्या बांधकामास यावल नगरपालिकेने परवानगी दिली आहे किंवा नाही?आणि बांधकामाची परवानगी दिली नसेल तर यावल नगरपालिका आणि संबंधित कर्मचारी आंधळे झालेले आहेत का? तसेच यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे हे यावल शहरात प्रत्यक्ष फेरफटका मारून दैनंदिन कामांची पाहणी करतात किंवा नाही? यावल शहरात सुरू असलेले बांधकामे नियमानुसार होत आहेत किंवा नाही किंवा ठिकठिकाणी अतिक्रमण केले जात आहे त्याची कोण खात्री आणि पाहणी करणार?असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
साधारण 200 ते 300 वर्षा पासून यावल शहरात रथ यात्रा हनुमान जयंती असा दुग्ध शर्करा योग असलेल्या दिवशी दरवर्षी खंडेराव मंदिरापासून खडकाई नदीपात्रातून यावल शहरात प्रवेश करतानाच्या ठिकाणी खंडेराव महाराजांच्या बारा गाड्या ओढल्या जात असतात. या बारा गाड्या ओढताना आणि रथयात्रेनिमित्त पंचक्रोशीतील नागरिकांची नदीपात्रात रथ आणि बारा गाड्या पाहण्यासाठी स्री–पुरुष नागरिकांची,लहान मुले,मुली,तरुण मुला-मुलींची मोठी गर्दी होत असते.यावेळेस सर्व जाती धर्मातील नागरिकांचे एकोप्याचे,जातीय सलोख्याचे दर्शन होत असते परंतु काही समाजविरोधक शांततेचा भंग करण्याच्या मानसिक तयारीत असल्याने मागे एक दोन वेळा अप्रिय घटना घडविण्याचे प्रयत्न करण्यात आले होते आणि आहे. आणि आता पुन्हा ज्या रस्त्यावरून बारा गाड्या ओढल्या जातात त्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याने बारा गाड्यांना त्या अतिक्रमणामुळे मोठा अडथळा अतिक्रमणाचा ब्रेक लागणार आहे.
त्यामुळे आता रथयात्रेच्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी ओढल्या जाणाऱ्या बारा गाड्या गावात प्रवेश न करता नदीतच समारोप केला जाईल का? याचे आत्मचिंतन आता संपूर्ण यावल शहरातील समाज बांधवांना करावे लागणार आहे तसेच राजकारणात समाजात स्वतःला सक्रिय समजणारे याबाबत फैजपूर भाग प्रांताधिकारी,यावल तहसीलदार, यावल पोलीस,यावल नगरपालिका ही सर्व यंत्रणा राजे निंबाळकर यांच्या किल्ल्याची साक्ष देऊन न्याय यंत्रणेमार्फत यावलकरांना काय न्याय देतात? पोलीस विभागाचे गोपनीय खाते ठराविक घटनांकडे आपले लक्ष केंद्रित करीत नाही का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असून या अतिक्रमणाकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
सुरू असलेल्या आणि झालेल्या या अतिक्रमणाबाबत यावल महसूल,यावल पोलीस, यावल नगरपालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी,विविध संघटनांनी वेळीच लक्ष केंद्रित करून यावल शहराचा जातीय सलोखा कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहणे कामी तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा पुढील होणाऱ्या सर्व कार्यवाहीस संबंधित यंत्रणा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे संपूर्ण यावल शहरासह परिसरात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा